33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : आमदार रोहित पवारांकडून अहमदनगर व राज्यासाठी 20 हजार लिटर सॅनिटायझरचा...

Coronavirus : आमदार रोहित पवारांकडून अहमदनगर व राज्यासाठी 20 हजार लिटर सॅनिटायझरचा पुरवठा

टीम लय भारी

जामखेड : ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) संकटकाळात कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार संपूर्ण महाराष्ट्राला मदत करीत आहेत. त्यांनी काल धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचा पुरवठा केला होता. आज पुन्हा त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझर पुरविले आहे. डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी १००० सुरक्षा चष्मे दिले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हा ओघ एवढ्यावरच थांबविलेला नाही. राज्यातील विविध भागांसाठी २० हजार लिटर सॅनिटायझर पुरविण्याचे ‘लक्ष्य’ त्यांनी ठेवले आहे. रोहित पवार यांच्या या सामाजिक औदार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Coronavirus , Rohit Pawar
आमदार रोहित पवार यांनी पाठविलेले ५०० लिटर सॅनिटायझर माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी स्विकारले.
Coronavirus
अहमदनरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी १०० लिटर सॅनिटायझर देण्यात आले

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत – जामखेडसाठी मतदारसंघात यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय राबविले आहेत. कोरोनाचा ( Coronavirus ) फैलाव होऊ नये म्हणुन मास्क, सॅनीटायझरचे वाटप त्यांनी केले आहे. ‘कोरोना’बाबत ( Coronavirus ) अधिकची काळजी म्हणून रोहित पवार समाजजागृतीही करीत आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

मतदारसंघासाठी ते मदत करीत आहेतच. पण राज्यासाठीही त्यांनी मदतीचा पुरवठा सुरू केला आहे. बारामती ॲग्रो लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी सॅनिटायझर निर्मितीवर भर दिला आहे. तयार होणाऱ्या सॅनिटायझर ते मोफत वाटप करीत आहेत.

Coronavirus
जनजागृतीसाठी जामखेडमध्ये असे कल्पक उपकम राबविले आहेत

आज त्यांनी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयासाठी ६०० लिटर सॅनिटायझर पाठविले. शिवाय, १००० चष्मे सुद्धा दिले आहेत. आणखी काही मदत लागल्यास सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी नगर जिल्हावासियांना दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

Covid19 : मुस्लिम बांधवांचे कौतुकास्पद पाऊल, ‘कोरोना’साठी देऊ केली इमारत

Coronavirus : देवेंद्र फडणवीस यांना रेशनिंगचे लाभार्थी व्हायचे आहे का ? : काँग्रेसने फटकारले

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या वर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी