33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ ( Covid19 ) आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेस टोपे फार उत्कृष्ट काम करीत आहेत. प्रसारमाध्यमांमधून ते वैद्यकीय बाबींची उत्कृष्ट पद्धतीने माहिती देत आहेत. बारकाईने समजून सांगत आहेत. त्यामुळे अनेकजण मला विचारत आहेत की, राजेशभैया डॉक्टर आहेत काय ? मी त्यांना सांगतेय की, राजेशभैय्या डॉक्टर नाहीत. ते इंजिनियअर आहेत’ असा किस्सा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार फारच कोरोना आपत्ती निवारणामध्ये ( Covid19 ) उत्कृष्ट काम करीत असल्याचे कौतुक केले. राजेश टोपे यांच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( Covid19 ) परिस्थिती फारच चांगली हाताळली आहे. केंद्र सरकारच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केला. मुख्यमंत्री वारंवार लोकांशी संवाद साधत आहेत. लोकांच्या अडचणी सोडवत आहेत. लोकांना आधार देत आहेत.

हे सुद्धा वाचा : खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

हे सुद्धा वाचा : आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

‘मरकज’च्या आयोजनावरून अनेकजणांनी खोटे व दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे व्हिडीओ जुने व खोटे असल्याचे लोकांच्या निदर्शनास आणून दिले. सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी देशमुख यांनी खूपच चांगली परिस्थिती हाताळल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.

या आपत्ती निवारणामध्ये ( Covid19 ) अजितदादा, जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासह बहुतांश मंत्री फार चांगले काम करीत आहेत. राज्याचे प्रशासन, अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उत्कृष्ट काम करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘कोरोना’वर ( Covid19 ) नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ वाढविण्याबाबत निर्णय होणार का याबाबत मी फार विचार करीत नाही. त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांच्या हिताचाच असेल. त्यामुळे त्यावर फार कुणी विचार करू नका. जो निर्णय होईल त्याचे पालन करा, असा सल्लाही सुळे यांनी दिला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : मुस्लिम बांधवांचे कौतुकास्पद पाऊल, ‘कोरोना’साठी देऊ केली इमारत

Lockdown21 : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार नाही : पोलीस अधिक्षकांनी भरला दम

कोरोनामुळे ७४ हजार मृत्यू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी