31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeजागतिकदलाई लामा यांनी माफी मागितली

दलाई लामा यांनी माफी मागितली

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ; मुलाला 'जीभ चोखायला' सांगण्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला; मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली

तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी माफी मागितली आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. त्यानंतर सोमवारी दलाई लामा यांनी मुलाला ‘जीभ चोखायला’ सांगण्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. याशिवाय, त्यांनी मुलाची व त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. आपल्या कृतीमुळे दुखावल्याबद्दल या मुलाची, त्याच्या कुटुंबाची आणि जगभरातील त्याच्या अनेक मित्रांची माफी मागत असल्याचे दलाई लामा यांच्या हवाल्याने जारी केल्या गेलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की दलाई लामा हे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी, कॅमेर्‍यांसमोरही, भेटलेल्या लोकांना निरागस आणि खेळकरपणे चिडवतात. त्यांना या घटनेबद्दल खेद वाटतो. अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी या लहानग्या मुलाला “जीभ चोखायला” सांगितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरात टीकेची लाट उसळली. मात्र, या दलाई लामा यांच्याप्रति सहानुभूती बाळगणारे मानतात, की परमपूज्य दलाई लामा हे तरुण मनाशी एक विशेष बंधन सामायिक करतात. त्यांच्यासाठी, नव्या पिढीतील मुले जगाचे मुख्य संरक्षक आणि शांततेचे वाहक आहेत.

यासंबंधी व्हायरल व्हिडिओमध्ये, दलाई लामा लहान मुलाला त्यांच्या उजव्या गालावर चुंबन घेण्यास सांगताना पाहिले जाऊ शकते. नंतर, ते मुलाला खेचताना आणि त्याच्या कपाळाला स्पर्श करताना दिसतात. त्यानंतर काही सेकंदांनंतर, व्हिडिओमध्ये दलाई लामा या लहानग्या मुलाला “जीभ चोखायला” सांगत असल्याचेही दिसते. विशेष म्हणजे, हे सर्व त्या अनुयायांसमोर घडले, त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. तरीही या व्हिडिओने जगभरात खळबळ उडवून दिली.

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

दलाई लामा फाईल फोटो (क्रेडिट : @dalailama / गुगल) Long Life Prayer
दलाई लामा फाईल फोटो (क्रेडिट : @dalailama / गुगल)

दलाई लामा यांच्या हवाल्याने जारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की “सामाजिक विषमता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पवित्र दलाई लामा यांनी केले आहे. कोणी समाजवादी असो किंवा नसो, माणसाने मानवतेच्या अधिक भल्यासाठीच विचार केला पाहिजे, असे दलाई लामा यांनी नुकतेच येथे चिल्ड्रन समिटसाठी बोलतांना उद्धृत केले होते. तिबेटी परंपरेनुसार, एखाद्याची जीभ बाहेर काढणे हे आदर किंवा कराराचे लक्षण आहे आणि पारंपारिक तिबेटी संस्कृतीत अनेकदा अभिवादन म्हणून वापरले जाते.”

नोव्हेंबर 2011 मध्ये जपानमधील त्सुनामीत उध्वस्त झालेल्या सेंदाई प्रदेशाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान दलाई लामा यांनी त्सुनामीतून वाचलेल्या एका तरुणाचे सांत्वन करताना सांगितलेल्या उपदेशाची निवेदनात आठवण करून दिली आहे. दलाई लामा म्हटले होते, “मुलगा इतरांच्या काळजीशिवाय जगू शकत नाही, प्रेम हे त्याचे सर्वात महत्वाचे पोषण आहे.” दलाई लामा यांच्यावतीने सोशल मीडियावर पसरवलेल्या चुकीच्या माहितीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले गेले की, अनेकदा जगभरात फिरणारे पवित्र साधू गर्भवती मातांना तिच्या बेबी बंपवर हात ठेवून आशीर्वाद देताना दिसतात. या सर्व प्रथा-परंपरात गैर काहीच नाही.

हे सुद्धा वाचा :

अरेरे, आधी ‘किस’ नंतर ‘नको ते’, दलाई लामांनी ‘हे’ काय केले !

Prakash Ambedkar : मागच्या दाराने मनुस्मृती आली प्रकाश आंबेडकरांकडून चिंतेचा सूर

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

 

Dharamshala is back on China’s radar—with US-born Mongolian boy’s anointment by Dalai Lama हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे झालेल्या समारंभात दलाई लामा यांनी अलीकडेच मंगोलियातील आठ वर्षांच्या मुलाला उत्तराधिकारी जाहीर केले. (फोटो क्रेडिट : गुगल)
हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे झालेल्या समारंभात दलाई लामा यांनी अलीकडेच मंगोलियातील आठ वर्षांच्या मुलाला उत्तराधिकारी जाहीर केले. (फोटो क्रेडिट : गुगल)

दलाई लामा यांनी अलीकडेच मंगोलियातील आठ वर्षांच्या मुलाला उत्तराधिकारी जाहीर केले आहे. या मुलाचा पुनर्जन्म असून तो तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक नेता असेल. त्या मुलाला 10वा खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे म्हणून ओळखले होते.

Dalai Lama Apologized, Boy Kiss Controversy, Viral Video, Magnolia Boy, Baudha Dharma Guru

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी