28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्य'लॉकडाऊन'च्या नियमावलीत थोडे बदल करून सुधारित नियमावली जाहीर

‘लॉकडाऊन’च्या नियमावलीत थोडे बदल करून सुधारित नियमावली जाहीर

टीम लय भारी
मुंबई: आपत्ती व्यवस्थापन धोरण 2005 च्या अंतर्गत अध्यक्षांच्या स्वाक्षरीने राज्य कार्यकारी समितीने काही अधिनियम जाहीर केले होते. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेले हे नियम पुढील काळातही लागू करण्यात येणार आहेत. त्यांचे राज्य पातळीवर पालन होणे अत्यावश्यक आहे. ( Government of maharashtra stated following notice in order to covid 19 rules)

Government

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सरकार जारी करत आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सरकार जारी करत आहे.

कलम 2 महामारी रोग कायदा अंतर्गत साथीचे रोग अधिनियम, 1897 साली केलेल्या कायद्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा 2005 मध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या त्यानुसार सध्याच्या निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे व अतिरिक्त निर्बंधांची अंमलबजावणी केल्यास कोरोनाची साखळी आपण तोडू शकू असे मंत्रायलातील सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे.

जय महाराष्ट्र की होम मिनिस्टर – निलेश राणे

अंबानींची नजर सबवे वर

दिनांक 4 जून 2021 रोजी लागू केलेले निर्बंध आणि ब्रेक द चेन ऑर्डर
लेव्हल 3 साठी पुढील 11 जिल्ह्यांत चालू ठेवण्यात येतील. यांत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड व पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वरील सर्व जिल्ह्यांत नवे नियम लागू करण्यात येतील, तसेच सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथील पूरपरिस्थिती नंतर उफाळून येणाऱ्या साथीच्या रोगांवर हे नवे नियम प्रभावी ठरतील. त्याबाबतीत संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या भागातील निर्बंध पाळले जात असल्याची खबरदारी घ्यावी.

तसेच मुंबई, मुंबईतील उपनगरे आणि ठाणे येथील निर्बंध कमी करण्याबाबत देखील निर्णय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घेतील असे नमूद करण्यात आलेले आहे.

वरील 14 जिल्हे सोडल्यास इतर भागांत आधीपासूनच जारी असलेले नियम काही प्रमाणात सुधारित केलेले आहेत व यापुढे सुधारित नियमांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होईल.

भारत आणि चीन सीमेदरम्यान सहावी हॉटलाईन प्रस्थापित

After 11 weeks of decline, Covid cases see 7.5% surge

  1. आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने (शॉपिंग मॉलसह)आठवड्याचे 6 दिवस रात्री 8 पर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सर्वांसाठी खुली राहतील . अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने आणि मॉल रविवारी बंद राहतील.

2. सर्व सार्वजनिक उद्याने आणि क्रीडांगणे चालणे, धावणे आणि सायकलिंग अशा व्यायामाच्या उद्देशाने खुली ठेवली जाऊ शकतात.

3. सर्व सरकारी कार्यालये पूर्ण दिवस चालू राहतील परंतु कामाच्या वेळा गर्दीच्या वेळा बदलून करता येऊ शकतात.

4. ज्या कार्यालयात घरून काम करणे शक्य आहे त्यांनी घरूनच काम करणे चालू ठेवावे.

5. सर्व कृषी उपक्रम, नागरी कामे, औद्योगिक उपक्रम, मालाची वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.

6. व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा या सारख्या सेवा 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सहित आठवड्यातील 5 दिवस रात्री 8 पर्यंत तर शनिवारी दुपाररी 3 पर्यंत चालू राहू शकतील. परंतु रविवारी वरील सर्व सुविधा बंद राहतील.

7. सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आत) पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

8. राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

9. राज्य शिक्षण विभाग आणि उच्च आणि तांत्रिक विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू होतील.

10. सर्व रेस्टॉरंट्स आठवड्याच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% आसन क्षमतेसह खुले राहतील व सर्व कोविड l9 प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या बंधनकारक राहील. पार्सल आणि टेकअवे सेवांना सध्या परवानगी आहे.

11. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत सर्वच हालचालींवर निर्बंध लागू होतील.

12. गर्दी टाळण्यासाठी, वाढदिवस साजरा करण्यावर निर्बंध, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, रॅली, निषेध मोर्चे यावरही निर्बंध लागू राहतील.

13. सर्व कोविड 19 प्रोटोकॉल – मास्कचा वापर, सामाजिक अंतर इ. काटेकोरपणे सर्व नागरिकांनी राज्यभर अनुसरण करावे. त्याचे कडक पालन करण्यात अपयश आल्यास परिणामी आपत्तीच्या संबंधित विभागांतर्गत संबंधितांवर कारवाई होईल.

व्यवस्थापन कायदा, 2005, महामारी कायदा आणि भारतीय दंड संहितेचे कलम 1860. या ऑर्डरमध्ये विशेषतः नमूद नसलेले इतर सर्व मुद्दे, पूर्वीच्या ऑर्डरसह अंमलात येतील.

असे आदेश महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे दिले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी