33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रअंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी दाभोळकरांचे विचार घराघरात पोहचविणार; वाचा काय आहे 'अंनिस'चा संकल्प

अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी दाभोळकरांचे विचार घराघरात पोहचविणार; वाचा काय आहे ‘अंनिस’चा संकल्प

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी अभियान’ चालू केले आहे. या अभियान अंतर्गत डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तके ५० % सवलतीच्या दारात मिळणार आहेत. डॉ. नरेन्द्र दाभोळकरांची १ लाख पुस्तके घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प असून दाभोळकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी तसेच समाजाला विवेकनिष्ठ आणि अंधश्रद्धमुक्त बनवण्यासाठी हे अभियान चालवण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित १० पुस्तकांची विक्री करण्यात येणार असून यामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोण, बुवाबाजी, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, अंनिसची देव-धर्मा विषयीची भूमिका, फलज्योतिष शास्त्र का नाही?, श्रद्धा अंधश्रद्धा फरक काय?, स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन, आध्यात्मिक बुवाबाजी, विवेकवाद आणि धर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे ह्या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय, प्रभाकर नानावटी लिखित डार्विनचा उत्क्रांतीवाद आणि कुमार मंडपे आणि प्रशांत पोतदार लिखित चमत्कार सादरीकरण कसे करावे? या पुस्तकांचीदेखीळ या उपक्रमाअंतर्गत विक्री केली जाणार आहे.

या बारा पुस्तकांची मुळ किंमत ३२० रुपये आहे. परंतु, या उपक्रमांतर्गत ५०% सवलतीच्या दरात फक्त १५० रुपये + ५० रुपये पोस्टेज खर्च एवढ्या रक्कमेत ही पुस्तके मिळणार आहेत.

या पुस्तकांची पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्वीच संपली असून ५ सप्टेंबर रोजी दुसरी आवृत्ती येणार आहे. या दोन्ही आवृत्तीचे मिळून १ लाख पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे.

हे ही वाचा 

शरद पवारांकडून नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचा शेलक्या शब्दांत समाचार

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना लावले ‘कामाला’

एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंसाठी माजी पंतप्रधानांच्या पत्राला केराची टोपली

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असून अजूनही त्यांच्या हत्येचा छडा लावता आलेला नाही. दुर्दैवाने अजूनही डॉ दाभोळकरांचे मारेकरी आणि सूत्रधार मोकाट फिरत आहेत. सुरवातीला पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडे देण्यात आली. पण अजूनही सुत्रधाराकडे पोहोचण्यास यंत्रणांना यश प्राप्त झाले नाही.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉक करत असंताना डॉ दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ची स्थापना केली. या संघटनेदवारे धर्माच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या फसवणुकीनला आणि अंधश्रद्धेला विरोध करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण जागृत करण्याचे काम करण्यात येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी