35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमनवाब मलिक दहशदवाद प्रकरण बॉंबस्फोटचा आरोपी बनणार माफीचा साक्षीदार

नवाब मलिक दहशदवाद प्रकरण बॉंबस्फोटचा आरोपी बनणार माफीचा साक्षीदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दहशतवाद्याना फंडिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.या प्रकरणात सरदार खान याला अटक करण्यात आली आहे.यावेळी त्याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनायचं असल्या बाबत कोर्टाला अर्ज केला आहे.त्याच्यावर सुनावणी होणार आहे.

नवाब मलिक याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या तीन गुन्ह्यात नवाब आरोपी आहेत.कुर्ला येथील गोवावाला कंपाउंड च्या व्यवहार केला होता.या व्यवहारात दाऊद याची बहीण हसीना पारकर त्याच प्रमाणे 1993 सालात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी सरदार शाहवली खान यांचा महत्वाचा रोल आहे. ही जागा नवाब मलिक यांनी घेतली आणि त्यांना हसीना पारकर आणि सरदार खान यांनी मदत केली.या बदल्यात त्याना पैसे देण्यात आलेत.

हाच पैसा पुढे दाऊद पर्यंत पोहचला आहे.असा आरोप आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यांच्या विरोधात ठाणे येथे खंडणीची केस आहे. त्याच प्रमाणे एन आय ए ने वेगळी केस दाखल केली आहे.त्यानंतर ईडीने ही केस दाखल केली आहे.या तिन्ही गुन्ह्यात नवाब मलिक यांचा संबंध जोडण्यात आला आहे.

या गुन्ह्यात सरदार खान हा देखील आरोपी आहे.मुख्य म्हणजे खान 1993 सालात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी आहे.त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.तो अजूनही जेल मध्ये आहे.तो जामिनावर असताना अनेक व्यवहारात सक्रिय होता.

हे देखिल वाचा

आर्यन खान ड्रग्स प्रकरण ,मॉडेल मूनमून हिचा खटल्यातून सुटका मिळवण्यासाठी अर्ज

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा सुप्रिया सुळे? 15 दिवसांपासून पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली

पृथ्वीराज चव्हाणांमुळे भीती प्रत्यक्षात उतरली; शरद पवारांची टिप्पणी

त्याला नवाब मलिक यांच्या गुन्ह्यात ही आता पुन्हा अटक करण्यात आली आहे.त्याला नुकतंच कोर्टात हजर करण्यात आलं.यावेळी त्याने आपल्याला माफी मिळावी, यासाठी आपण माफीचा साक्षिदार , सरकारी साक्षीदार व्हायला तयार असल्याचं एका अर्जाद्वारे कोर्टाला सांगितले. कोर्टाने त्याचा अर्ज स्वीकारला आहे.त्यावर आता सुनावणी होईल.त्यानंतर त्याच्या अर्जावर कोर्ट निकाल देणार आहे. मात्र , खान याचा अर्ज स्वीकारला गेला तर नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Nawab Malik Terrorism Case
Accused of bombing will become witness of apology

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी