27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमहादेव जानकरांना शरद पवारांविषयी आदर, महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन...

महादेव जानकरांना शरद पवारांविषयी आदर, महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन !

शरद पवार यांना राजकारणात राहण्याचा सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. मात्र, पवारसाहेबांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गरज असल्यामुळे त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीतच रहावे, अशी नम्र अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांना राजकारणात राहण्याचा सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. मात्र, पवारसाहेबांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गरज असल्यामुळे त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीतच रहावे, अशी नम्र अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याविषयी प्रतिक्रिया देताना जानकर बोलत होते.ते म्हणाले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची देशाला आणि महाराष्ट्राला गरज आहे. देशात जे काही १० ते १२ मोठे नेते आहेत. त्यामध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. पक्ष कुठलाही असो, स्व. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ही माणसे मोठी होती.

शेवटी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल, पण शरद पवार यांनी राजकारणातून बाहेर जाणे, ही सर्वांसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचंड विरोध केला जात आहे. त्यामुळे पवार राजकारणातून बाहेर पडतील असे मला वाटत नाही.

हे सुद्धा वाचा :

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा सुप्रिया सुळे? 15 दिवसांपासून पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली

साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे पशुसंवर्धन सचिव !

पवारसाहेबांना कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागणार आहे, अशी वेगळी भूमिका अजित पवार यांनी मांडली असली तरीही शेवटी ते त्यांचे पुतणे आहेत. बाहेर वेगळे चित्र दिसत असले तरीही घरातील लोक एकच असतात. पवारसाहेबांनी डोळे वटारल्यास अजित पवार त्यांचा आदेश मानणार नाहीत, असे होणार नसल्याचे जानकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी