30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा लंडनमध्ये झेंडा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा लंडनमध्ये झेंडा

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व युवा नेते उमर फारूकी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. तिथे ते कायद्याचे शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी तेथील एका नामांकित संघटनेमध्ये स्थान मिळविले आहे ( NCP leader Umar Farooqui selected for foreign association ) .

‘लिंकनजीन विद्यार्थी असोसिएशन’ ही जगात नावलौकीक असलेली संघटना आहे. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेत असलेल्या हुशार व बुद्धिमान तरूणांची या संघटनेमध्ये नियुक्ती केली जाते. इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व ज्येष्ठ विधीज्ञ या संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्त करीत असतात.

आपल्या कर्तृत्वाने उमर यांनी या संघटनेमध्ये प्रतिनिधी पदावर स्थान मिळविले आहे. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेत अशा प्रकारे स्थान मिळविले होते.

हे सुद्धा वाचा

Covid-19 : राष्ट्रवादीचा नेता ब्रिटनमध्ये, अडकलेल्या भारतीयांना करतोय मदत

मंदिरे उघडली, पण ‘यांना’ मिळणार नाही प्रवेश

Bigg Boss 14 l जान सानूने माझ्या मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

उमर हे मुळचे औरंगाबादचे आहेत. त्यांनी एम. पी. लॉ. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लंडनच्या विधी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. आता ते या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लंडनच्या विविध न्यायालयांमध्ये सहायक विधीज्ञ म्हणून काम पाहिले होते. त्यात त्यांनी उत्कृष्ट काम केले होते.

लंडनच्या विधी विद्यापीठातून जगातील नामवंतांनी शिक्षण घेतले आहे. मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी अशा मान्यवरांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी