31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंनी सफाई कामगारांच्या खांद्यांवर हात ठेवले, अन् फोटो काढला

राज ठाकरेंनी सफाई कामगारांच्या खांद्यांवर हात ठेवले, अन् फोटो काढला

टीम लय भारी

मुंबई : रस्ते, मैदाने, गटारे स्वच्छ करण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करीत असतात. घाण साफ करणाऱ्या या ‘माणसांच्या’ जवळ जाण्यासही पांढरपेशा लोकांना नको वाटते. पण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या कामगारांना जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, अन् फोटोही काढला (Raj Thackeray put his hand on the worker’s shoulder and took a photo )

राज ठाकरे दररोज छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ( जुने नाव शिवाजी पार्क ) टेनिस खेळण्यासाठी जात असतात. शनिवारी सुद्धा राज ठाकरे सायंकाळी टेनिस खेळण्यासाठी गेले होते ( Raj Thackeray plays tennis ).

मुंबई महापालिकेचे सफाई कामगार त्यावेळी मैदानात साफसफाई करीत होते. राज ठाकरे यांना पाहताच त्यांनी सोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावर राज यांनी या कामगारांना जवळ बोलविले. एखाद्या मित्राप्रमाणे दोघांच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले, अन् छायाचित्रही काढू दिले.

सध्या ‘कोरोना’चा कहर माजलेला आहे. लोक एकमेकांच्या जवळ येत नाहीत. तरीही राज ठाकरे यांनी ‘कोरोना’चा बागुलबुवा उभा केला नाही. उलट समाजाकडून दुर्लक्षित असलेल्या या घटकांना आपलेपणाची वागणूक दिल्याने राज यांचे कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

MNS Effect : मनसेच्या मागणीला अ‍ॅमेझॉनचा प्रतिसाद, मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करणार

MNS : मनसेच्या दणक्याने ‘मराठी’ लेखिकेचे आंदोलन यशस्वी, पोलिसही आले अन् मुजोर सराफाने माफीही मागितली

मनसे – शिवसेनेमध्ये जुंपली, ‘मनसे’कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

सफाईगार कामगारांच्या समस्यांवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने अनेकदा आंदोलन केली आहेत. या कामगारांना सोयी सुविधा व पुरेसा मोबदला मिळावा यासाठी महापालिकेकडे सुद्धा पाठपुरावा केला आहे.

‘कोरोना’ काळात ‘मनसे’ने लोकांची वीज बिले कमी व्हावीत, रेल्वे प्रवास सुरू व्हावा, मंदिरे खुली करावीत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटाव्यात अशा विषयांवर आवाज उठवला होता. राज ठाकरे व त्यांची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ सामान्य लोकांसाठी लढे देत आहे. अशा वातावरणात राज ठाकरे यांनी सफाई कामगारांसोबत काढलेले छायाचित्र सामान्य लोकांच्या प्रशंसेसाठी पात्र ठरले आहे ( MNS agitation in Corona pandemic ).

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी