31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज; आयसीएआय नाशिक शाखा

लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज; आयसीएआय नाशिक शाखा

अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत करतो. बहुतांश वेळा याबाबत असलेल्या अज्ञानामुळे असे होतांना दिसते. त्यामुळेच लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी गरज ओळखून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नाशिक शाखा काम करत आहे. सोबतच या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासपूर्ण उपक्रम हाती घेत असल्याची माहिती आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए संजीवन तांबुलवाडीकर यांनी दिली आहे

अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत करतो. बहुतांश वेळा याबाबत असलेल्या अज्ञानामुळे असे होतांना दिसते. त्यामुळेच लोकांमध्ये आर्थिक साक्षरता (financial literacy) निर्माण करण्यासाठी गरज ओळखून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) (ICAI) नाशिक शाखा काम करत आहे. सोबतच या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासपूर्ण उपक्रम हाती घेत असल्याची माहिती आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए संजीवन तांबुलवाडीकर यांनी दिली आहे.(Creating financial literacy among people is the need of the hour; ICAI Nashik branch )

आयसीएआयबाबत अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही संसदेच्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. याची स्थापना The Chartered Accountants Act, 1949 च्या नुसार झालेली आहे. या संस्थेचे कामकाज भारतामध्ये चार्टर्ड अकाऊंटंटचे नियमन व विकास करायचा असे आहे. आयसीएआय ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. ही संस्था नेहमीच आपल्या सेवा आणि कार्यातून भारतीय अर्थव्यवस्था जपायचे आणि त्याच्या विकासासाठी काम करते.

आयसीएआयची नाशिक शाखा याच संस्थेचा एक घटक म्हणून कार्यरत आहे. नाशिक शहराच्या विकासाबरोबर कॉमर्स, इकॉनॉमी, आणि अकाऊंट्न्सी या क्षेत्रात अग्रेसरपणे काम करताना दिसते. नाशिक शाखेची स्थापना साल 1981 झाली आहे. तेव्हापासून शहरातल्या सीए यांच्या वाढीस आणि कामात संस्था हातभार लावते आहे. सोबतच सीए अभ्याक्रमाचे व विदयार्थी विकासाचे कामही अतिशय यशस्वीपणे करते आहे. सध्या शहरामध्ये 1800 हून अधिक सीए आणि 5000 हुन अधिक विद्यार्थी आहेत. या सगळ्यांच्या विकासासाठी ही शाखा नेहमीच कार्यक्रम घेते. यातून विविध विषय जसे की, Income Tax, Gst, Audit, Capital Market, Al, Technology, study of economy हे विषय विद्यार्थ्यांना समजतात.

असे आहे यावर्षाचे नियोजन

आयसीएआय च्या नाशिक शाखेने चालू वर्षासाठी अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये 1000 हून अधिक सीए आणि 2000 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध आणि नाविन्यपूर्ण विषयांवर चर्चासत्र आणि करांमध्ये होणाऱ्या बदलांवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर अभ्यास दौरे, परीसंवाद, चर्चासत्रे घेतली जाणार आहेत.

यंदा जून महिन्यात नाशिकमध्ये सीए लोकांसाठी राज्यस्तरीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. यात नाशिक शहरासोबतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून सीए सहभागी होतील. याच बरोबर पुढील वर्षात Start up मेळा, Capital Market Conclave, Gst Workshop असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. याबरोबरच ही संस्था सामाजिक उपक्रमही घेते. यंदाही ते घेतले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी , सीए अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम, करीयर मार्गदर्शन आदींचा समावेश असेल.

यावेळी पत्रकार परिषदेला आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए संजीवन तांबुलवाडीकर, उपाध्यक्ष सीए जितेंद्र फापट, सचिव अभिजित मोदी, खजिनदार सीए मनोज तांबे, विद्यार्थी शाखेचेस अध्यक्ष सीए विशाल वाणी, माजी अध्यक्ष राकेश परदेशी आणि सोहिल शाह तसेच सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय कार्यकारणीचे विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष पियुष चांडक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी