31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्र'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळ मनोज जरांगेच्या टीकेवर भुजबळ संतापले

‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ छगन भुजबळ मनोज जरांगेच्या टीकेवर भुजबळ संतापले

ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं जरांगे पाटील म्हणत आहेत. पण मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही असा टोला छगन भुजबल यांनी रविवारी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटील याना लगावला . नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याने आपण माघार घेतली असाही दावा त्यांनी केला.

ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं जरांगे पाटील म्हणत आहेत. पण मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही असा टोला छगन भुजबल (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटील याना लगावला . नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याने आपण माघार घेतली असाही दावा त्यांनी केला.(‘I am not afraid of anyone’s father’: Chhagan Bhujbal reacts to Manoj Jarange’s remark)

“प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर अतिशय अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. लोकांना कोणाला मत द्यायचं याचा अधिकार असून, भीती दाखवण्याची गरज नाही. समोरच्या कोणी उमेदवारांनी केलं असेल असे मला वाटत नाही. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात आणि मग ते असं काहीतरी करतात. असं छगन भुजबळ म्हणाले लोकांना कोणाला मत द्यायचं याचा अधिकार असून, भीती दाखवण्याची गरज नाही. समोरच्या कोणी उमेदवारांनी केलं असेल असे मला वाटत नाही. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात आणि मग ते असं काहीतरी करतात. असं छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाच्या एकीमुळेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. प्रत्येक टप्प्यात मोदींना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावं लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे काय मोदींपेक्षा मोठे नेते लागून गेले का?, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले.

भुजबळ यांनी जरांगे म्हणजे काय मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? अख्खा हिंदुस्थान जरांगेंना घाबरलाय. जरांगे काय सांगतात, काय बडबड करतात. त्याची अक्कलहुशारी किती? नाशिक आणि बीडमध्ये जाऊन मनोज जरांगे म्हणतात की, या ओपनच्या जागांवर ओबीसी उमेदवार कशासाठी उभे राहतात? त्यांना कळत नाही ओबीसींना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण नाही. ही गोष्ट ज्याला कळत नाही, त्याला आपण काय सांगायचं. मनोज जरांगे सध्या कोणाच्याही खिजगणतीतही नाही, ते उगाच बेडकाप्रमाणे फुगत आहेत, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी