33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओश्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

सोनाई परिसरातील एका शेतकऱ्यासोबत गप्पा मारल्या. श्रीरामाचे मंदिर बांधले गेले ही चांगली बाब आहे परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, ३७० कलम हटवल म्हणून सिलेंडरच्या किमती कमी होणार नाहीत, अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP Government)
या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली. यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सोनाई परिसरातील एका शेतकऱ्यासोबत गप्पा मारल्या. श्रीरामाचे मंदिर बांधले गेले ही चांगली बाब आहे परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, ३७० कलम हटवल म्हणून सिलेंडरच्या किमती कमी होणार नाहीत, अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी जाहीर केली अधिक कर्जमाफी पूर्ण करायच्या अगोदरच त्यांचं सरकार पाडलं गेलं. उद्धव ठाकरे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती आहे. एकनाथ शिंदे मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे गुण दिसत नाहीत. ६० लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेली, या ६० जणांबद्दल लोकांच्या मनात चांगल्या भावना नाही. आमचे आमदार शंकरराव गडाख शिवसेना सोडून गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर जनता खुश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी