26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगजू घोडके यांचे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी उपोषण

गजू घोडके यांचे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी उपोषण

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे आंदोलनास बसून पुन्हा एकदा सुरू केल्याने त्याला शह देण्यासाठी तसेच ओबीसी बारा बलुतेदारांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी बुधवार पासून गोल्फ क्लब मैदानावर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके बसले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे गुढच कुणाला उकलत नाही. मराठा आंदोलन समितीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांना उभे करण्याची वल्गना त्यांनी केली होती. मात्र त्यांनी ती काही काळातच मागे घेतली.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे आंदोलनास बसून पुन्हा एकदा सुरू केल्याने त्याला शह देण्यासाठी तसेच ओबीसी (OBC’s right to justice) बारा बलुतेदारांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी बुधवार पासून गोल्फ क्लब मैदानावर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके (Gaju Ghodke) बसले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे गुढच कुणाला उकलत नाही. मराठा आंदोलन समितीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांना उभे करण्याची वल्गना त्यांनी केली होती. मात्र त्यांनी ती काही काळातच मागे घेतली.(Gaju Ghodke’s hunger strike for OBC’s right to justice

सर्वच मतदार संघात बहुसंख्य ठिकाणी मराठा उमेदवार उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या उमेदवारांच्या मतांवर काही परिणाम होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी घुमजावचा निर्णय घेतला. ही गोष्ट लपून राहिलेली नाही. पंकजा मुंडे, महादेव जानकरसह अनेक ओबीसी नेत्यांना पाडण्यात तसेच ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांचे तिकीट कापण्यात आम्ही यशस्वी झालो. अशी डरकाळी फोडून जरांगे पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा कावेबाजपणा आम्ही निश्चित हाणून पाडू.विधानसभा निवडणुकीत जनरल जागांवर खऱ्या ओबीसींना म्हणजे बारा बलुतेदारांना जास्तीत जास्त तिकिटे मिळावीत अशी आमची प्रमुख मागणी राहील गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी सांगीतले. या जागांवरएका विशिष्ट समाजाचे असलेले वर्चस्व यापुढे आम्ही खपवून घेणार नाही,असा इशाराही गजू घोडके(Gaju Ghodke) यांनी पत्रकात दिला आहे. ओबीसींच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठीच तेरा जूनपासूनचे आपलं आंदोलन आहे, याची आठवणही घोडके (Gaju Ghodke) यांनी यावेळी करून दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी