28 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा - मराठा आंदोलक नाना बच्छाव

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे उमटलेले तीव्र पडसाद बघता आज नाशिकच्या शिवतीर्थ येथे पुन्हा सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीत वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने मराठा समाजाला ओबीसी तून ५० टक्केच्या आत आरक्षण, व सगेसोयरे अद्यादेश अंमलबजावणी बाबतीत १०० रुपयाचे स्टॅम्प व जाहीरनामा थेट सकल मराठा समाज आंदोलक नाना बच्छाव यांना सुपूर्द करुण मला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी केली,

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे उमटलेले तीव्र पडसाद बघता आज नाशिकच्या शिवतीर्थ येथे पुन्हा सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते नाना बच्छाव ( Nana Bachhav) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीत वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने मराठा समाजाला ओबीसी तून ५० टक्केच्या आत आरक्षण, व सगेसोयरे अद्यादेश अंमलबजावणी बाबतीत १०० रुपयाचे स्टॅम्प व जाहीरनामा थेट सकल मराठा समाज आंदोलक नाना बच्छाव ( Nana Bachhav) यांना सुपूर्द करुण मला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी केली,(Maratha protester Nana Bachhav: Fight for a united society by ending factional disputes )

यावेळी दि १६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या पाठिंबा पत्रावर नाना बच्छाव ( Nana Bachhav) यांनी भूमिका मांडली.मराठा समाज तटस्थ राहणार आहे असे स्पष्ट सांगितले,

दिनांक १६ रोजी सकल मराठा समाज नाशिक वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाजात उलट सुलट प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोप अशी स्थिती निर्माण झाली होती, याला कुठं तरी पूर्ण विराम मिळून समाज एकसंघ राहावा या भूमिकेने आज दि १७ मे रोजी नाशिकच्या शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजाचे नाना बच्छाव ( Nana Bachhav) यांनी समाजाची बैठक बोलावली, यावेळी नाना बच्छाव यांनी सकल मराठा समाज नाशिक जिल्हा वतीने भूमिका मांडताना झालेला पत्रकार परिषदेचा प्रकार व पाठिंबा हा सकल मराठा समाजाचा ठरावं किंवा निर्णय नाही,ही त्यांच्याकडून झालेली चूक समजून या वादावर पडदा टाका, त्यांनी ही समाजासाठी योगदान दिले आहे. हे विसरू नका, मात्र झालेला प्रकार दिलेला पाठिंबा या बद्दल मराठा समाज जाणकार आहे, जो समाजासाठी लढेल त्याला समाज कौल देईल, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला धरून सकल मराठा कुणाही पक्ष व्यक्तीस पाठिंबा देणार नाही, हीच आमची भूमिका आहे,जर काही मुलांवार गुन्हे नोंदवले असतील तर ते मागे घ्यावे यासाठी मी जबाबदारी घेतो,आता तो मुद्दा पुन्हा नको, कोणी ही मर्यादा सोडू नये असी स्पष्ट मांडणी केली

यावेळी वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी मी स्वतः १५ वर्षे समाजासाठी लढतोय बोलावलं तेव्हा आलो,मात्र परस्पर विरोधी भूमिका का? जे उमेदवार समाजाचे नाव ही घेत नाही त्यांना एकतर्फी पाठिंबा देणारे कोण? ही सकल मराठा समाजाची भूमिका नसताना असा पाठिंबा का? मी आज स्टॅम्प वर लिहून देतो अखेर पर्यंत मराठा समाजासाठी लढेल चुकलो तर राजीनामा देईल असे मी स्टॅम्प करुण देतोय,मला समाजाने पाठिंबा द्यावा, असे स्पष्ट मांडणी यावेळी त्यांनी केली, यावेळी विलास पांगरकर,शरद तुंगार, चेतन शेलार, तुषार जगताप, राम खुर्दळ यांनी आपले विचार भूमिका मांडली,मराठा आंदोलक राम खुर्दळ यांनी घडलेल्या विषयावर पडदा टाकून शेवटच्या मराठा समाजातील माणसे जोडा अजून लढा संपलेला नाही, निवडणूकित जो समाजाचा तो मराठा समाज स्वीकारेल त्यामुळं सकल मराठा जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समरस आहे असेल, यावेळी नाना बच्छाव, वंचितचे उमेदवार करण गायकर, विलास पांगारकर,सचिन पाटील,नितीन डांगे पाटील,चेतन शेलार,राम खुर्दळ,शरद तुंगार, श्रीराम निकम,सचिन पाटील,तुषार जगताप, महेश शेळके,आशिष हिरे, महेंद्र देहरे,भारत पिंगळे, नितीन पाटील,राकेश सोनवणे,गौरव गाजरे,निलेश ठुबे,यासह अनेक मराठा बांधव यावेळी उपस्थित होते,

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी