33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सकल मराठा समाजाचा नाशिकमध्ये रास्ता रोको

नाशिक सकल मराठा समाजाचा नाशिकमध्ये रास्ता रोको

आज नाशिक मधील आडगाव जुना जकात नाका येथे मुंबई-धुळे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून ५९% च्या आत आरक्षण द्यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे,तयार करण्यात आलेला सगेसोयरे मसुदा त्याचे कायद्यात रूपांतर करून तात्काळ जीआर काढावा. येत्या २० तारखेला विशेष अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होत असून या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व आमदार,मंत्री महोदयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकजुटीने आवाज उठवावा या सर्व मागण्यासाठी आज प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीने करण्यात आले.

आज नाशिक मधील आडगाव जुना जकात नाका येथे मुंबई-धुळे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून ५९% च्या आत आरक्षण द्यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे,तयार करण्यात आलेला सगेसोयरे मसुदा त्याचे कायद्यात रूपांतर करून तात्काळ जीआर काढावा.
येत्या २० तारखेला विशेष अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होत असून या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व आमदार,मंत्री महोदयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकजुटीने आवाज उठवावा या सर्व मागण्यासाठी आज प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जागे व्हा जागे व्हा महाराष्ट्रातील आमदारांनी जागे व्हा,
जागे करा जागे करा राज्य सरकारला जागे करा,मराठा समाजाला 50% च्या ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे,कुणबी चे दाखले सरसकट वाटप झालेच पाहिजे,सगे सोयरे या शब्दाचे कायद्यात रूपांतर झालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,या घोषणांनी संपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी रास्ता रोको ला मार्गदर्शन करताना उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी सांगितले की येत्या 20 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाची फसवणूक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये,जर तसा प्रयत्न केला तर राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल आणि असे होवू नये असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आता काळजी घ्यावी कारण आता मराठा समाज शांत बसणार नाही,आमच्या हक्काच्या मागण्या पूर्ण केल्या तर सरकारच अभिनंदन करू नाहीतर सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभ करू. आमच्या हक्काच्या आरक्षणावर जर कोणी हक्क सांगत असेल तर त्या हक्क संगणाऱ्याला आता त्यांची जागा दाखवून देऊ राज्य सरकारने प्रामाणिकपणे आमची मागणी मान्य करावी असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

तसेच चंद्रकांत बनकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला पुढे करून मराठा समाजाचा आवाज दाबण्यापेक्षा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याकडे ज्या मागण्या मराठा समाजाच्या वतीने केल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे,आता मराठा समाजाचा आवाज दाबण्याची ताकद कुठल्याही सरकारमध्ये नाही व तसा प्रयत्नही करू नये.

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय करण गायकर यावेळी म्हणाले की मंत्री छगन भुजबळ हे काय राज्याचे मालक नाहीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या दबावात येऊन मराठा समाजावर अन्याय करू नये, मराठा समाज त्यांच्या हक्काच आरक्षण मागतोय 55 लाख समाज बांधवांचे कुणबीचे पुरावे सापडले असताना त्या आधारावर सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आत संविधानिक आरक्षण द्यावे भुजबळांना घाबरून जर राज्य सरकार मराठ्यांवर अन्याय करणार असेल तर येणाऱ्या काळात राज्य सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय परंतु 20 तारखेनंतर मराठा समाजाचा उद्रेक होतांना सरकारला बघायचा असेल तर सरकारने आम्हाला आता फक्त फसवून दाखवावे असा घनाघात राज्य सरकारवर केला.

या रास्तारोको आंदोलना मुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, यावेळी देखील आंदोलकांकडून परत एकदा शिस्तीचे दर्शन बघायला मिळाले, एवढ्या ट्रॅफिक जाम झालेली असताना देखील ॲम्बुलन्स आल्यानंतर त्या ॲम्बुलन्सला जाण्यासाठी मराठा सकल समाजाच्या बांधवांनी वाट करून दिली.
या आंदोलनात आडगाव पंचक्रोशीतील तसेच नाशिक शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये करण गायकर,नाना बच्छाव,चंद्रकांत बनकर,बालाजी माळोदे,सुनिल जाधव,अतुल मते,प्रभाकर माळोदे,किरण डोखे,उमेश शिंदे,मिथुन लबडे,वैभव दळवी,विकास काळे,प्रकाश रसाळ,संतोष जगताप,सचिन पवार,पोपट शिदे,रामभाऊ जाधव,रविंद्र जाधव,सुदाम दुशिंग,प्रकाश शिंदे,मनोरमा पाटील,संगीता सूर्यवंशी,रेखा पाटील,रूपाली काकडे,सविता वाघ स्वाती कदम,रोहिणी उखाडे,एकता खैरे,शितल माळोदे,नितिन माळोदे,नामदेव माळोदे,भाऊसाहेब मते,योगेश नाटकर, संदीप खुटे,राम निकम,विक्रांत देशमुख विजय पेलमहाले,नितीन खैरनार,राजू भालेराव,अनिल आहेर,महेंद्र बेहेरे,प्रकाश आहेर,प्रल्हाद जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी