गेल्या वर्षी महानगरपालिका शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची मोठी चणचण उदभवल्याचे चित्र होते. त्यातून बोध घेउन यंदाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी साडे बार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्या विद्यार्थ्याना त्रास सहन करुन टपकणाऱ्या वर्गामध्ये बसण्याची वेळ येते. गेल्या वर्षी निधी अपुरा पडल्याने शिक्षण विभागाला दुसऱ्या विभागाचे दारे ठोठवण्याची वेळ आली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात मनपाने आपल्या शाळांसाठी 12 कोटी 38 लाखाची तरतूद केली आहे.नाशिक महानगरपालिका शहरात विविध विकास कामांवर कोटयावधींची उधळ्पट्टी होते. परंतु दुसरीकडे आपल्याच शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी अभावी शाळांंचे काम रखडले होते. नाशिक शहरात मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकुण शंभर शाळा आहेत.
यामध्ये मराठी माध्यमाच्या प्राथमिक 73, हिंदी माध्यमाच्या 4, उर्दू माध्यमाच्या 11 अशा एकुण 88 तर मराठी माध्यमिक विद्यालय 10, उर्दू माध्यमिक 2 अशा 12 माध्यमिक शाळा आहेत. गेल्या वर्षी शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी अपुरा पडल्याने शिक्षण विभागाला निधीकरिता दुसऱ्या विभागाचे दार ठोठावण्याची वेळ आली होती. परंतु कोणत्याही विभागाने शिक्षण विभागाला मदतीचा हात दिला नसल्याचे दिसून आले होते. मनपाच्या शाळांचे चित्र बदल असून स्मार्ट स्कूल अंतर्गत आतापर्यत शहरातील 82 शाळांमधील 656 स्मार्ट क्लासरुम करण्यात आल्या आहेत. 69 संगणक कक्ष, 656 वर्गामध्ये 75 इंची इंटर ॲक्टीव फ्लॅट पॅनल, डिजीटल अभ्यासक्रम, इंटरनेट लॅन कनेक्टिव्हीटी, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बॅच, एलइडी ट्युबलाईट, टेबल आदीसह वर्ग खोल्या अत्याधुनिक करण्यात आल्या आहेत. मात्र उर्वरीत शाळांमध्ये स्मार्ट कामे झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात वर्ग खोल्यात पावसाचे पाणी टपकत असते. 2022-23 मध्ये 7 कोटी 31 लाख, 2023-24 साली 7 कोटी 51 लाख याप्रमाणे तरतूद करण्यात आली होती.