30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशासकीय महापुजेवेळी विठुरायचे मुखदर्शन राहणार सुरू

शासकीय महापुजेवेळी विठुरायचे मुखदर्शन राहणार सुरू

आषाढी एकादशीला सर्व पालख्या पंढरपूरामध्ये दाखल होतात. या पालख्यांबरोबर वारी करत लाखों भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. यावर्षी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय माहापुजेच्या वेळी मुखदर्शन सुरू राहणार आहे. असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे. शासकीय महापुजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद केली जाते. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढल्यामुळे वारकऱ्यांची दर्शनाची मोठी गैरसोय व्हायची. वारकऱ्यांची ही गैरसोय होऊ नये म्हणून ह्यावर्षी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीज वाजता पुजेला येत असतात. जवळपास पहाटे पाचवाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात सुरू असतो. या पूजेसाठी दर्शनाची रांग बंद केल्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना आषाढी एकादशीच्या पवित्रदिनी दर्शनापासून मुकावे लागते. यासाठीच सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांना देण्यात येणाऱ्या पासेसशिवाय कोणतेही व्हिआयपी दर्शन पासेस दिले जाणार नाहीत. असे महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे.

हे सुध्दा वाचा:

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामान्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वाचा कधी व कुठे खेळले जाणार सामने

मुंबईसह राज्यात पावसाने लावली हजेरी, बळीराजाला दिलासा

मुंबईत पाचशेच्या बनावट नोटा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या !

वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दर्शनासाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशीच्या दिवशी विठुरायचे दर्शन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी व्हिआयपी बंदीची पूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन देखील यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही. व वारकऱ्यांचे देखील दर्शनासाठी हाल होणार नाहीत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी