30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपाच महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन; मिळाला समाधानकारक भाव

पाच महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन; मिळाला समाधानकारक भाव

कांदा हा जेवणातील महत्वाचा घटक. भाज्यांना फोडणी देण्यासाठी 98 टक्के लोक कांद्याचा वापर करतात. त्यामुळे कांद्याचे भाव वाढल्यास गृहिणीच्या डोळ्यात पाणी येते. पाच महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाला आहे. तर पाच महिन्यानंतर कांद्याचा भाव वाढला आहे. दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 ते 18 रूपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. पण किरकोळ विक्री 30 रूपये किलोने होत आहे. त्यामुळे नागरिक काहीसे नाराज आहेत.

मुंबई कृषी उत्पत्न बाजार समितीत जानेवारी महिन्यांनध्ये कांद्याला 13 ते 22 रुपये प्रति किलो भाव मिळत होता, मात्र फेब्रुवारीपासून भाव घसरण्यास सुरुवात झाली होती. कांद्यांचा भाव हा नाफेडमुळे वाढला गेला. नाफेडने कांदा खरेदी केल्यानंतर थोड्या प्रमाणात भाव वाढण्यास सुरुवात झाली. बुधवारी मुंबईच्या बाजार समितीमध्ये 1298 टन आवक झाली असून कांदा 10 ते 18 रुपये किलो दराने विकला गेला. एप्रिल व मे महिन्यात 5 ते 11 रुपये दराने कांद्याची विक्री होत होती. शेतकऱ्यांना कमी भाव मिळून उत्पादन आणि वाहतूकीचा खर्च वगळता हातामध्ये कमी पैसे येत होते. मुंबईच्या बाजार समितीमध्ये महिन्याभरातील कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात वाढला आहे. तर जानेवारीमध्ये 13 ते 22 प्रतिकिलो, फेब्रुवारीत 9 ते 15, मार्चमध्ये 7 ते 13, एप्रिलमध्ये 7 ते 11, मेमध्ये 5 ते 11 असून जूनमध्ये 5 ते 14 रु भाव मिळाला होता.

हे सुध्दा वाचा:

काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का ? आज मुंबईमध्ये होणार काँग्रेसच्या नेत्यांची बैठक

महिला प्रवासी सुरक्षितेसाठी राज्य आणि रेल्वे पोलिसांनी समन्वयाने काम करावे- उपसभापती डॉ. गोऱ्हे

वय 82 झालं, कधी थांबणार आहात की नाही? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तरी बळीराजाला याचा काय फायदा होणार? हाच प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, परिस्थिती फारशी बदलली नाही. राजकीय नेत्यांकडून केवळ आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. शेतकऱ्यांनाच्या शेती मालाला मिळणारा हमीभाव ही तर देशभरातील शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे. वर्षभर मेहनत करुन मोठ्या कष्टाने पीक घ्यायचं पण त्याला बाजार भावच मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात ओढला जातो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी