30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमहामार्गावरील व सेवा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाचवड ग्रामस्थ आक्रमक

महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाचवड ग्रामस्थ आक्रमक

टीम लय भारी

भुईज : दररोज होणा-या अपघात व जखमी यांच्या किंकाळ्या व स्थानिकांचे मदतकार्य याची दखल घेत अखेर तालुका प्रशासन पाचवडकरांच्या मदतीला आले. तहसीलदार रणजीत भोसले यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर ग्रामस्थ शांत तर संबंधीत ठेकेदाराची यंत्रणा खड्डे बुजवण्यासाठी दाखल झाले आहेत (Panchwad villagers aggressive to repair potholes on highways and service roads).

पुणे बंगलोर महामार्गावर टोलनाका ते वेळे दरम्यान महामार्गावर, सेवारस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे दररोज अनेक दुचाकी व चारचाकी आदळून होणारे लहान मोठे अपघात व यात जखमी होणारे जिल्हावासीय आणि मदतकार्य करणारे स्थानिक यांचे दररोजचे चित्र पाहून संतप्त झालेल्या पाचवडकरांनी आज दुपारी १२ बाजनेच्या दरम्यान पाचवड बस स्थानकासमोर पडलेल्या गाड्डयावरच उभे राहून रस्ता रोको केला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून ओमप्रकाश शेट्ये यांची नियुक्ती

Panchwad
महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाचवड ग्रामस्थ आक्रमक

परप्रांतातून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे

त्याला निमित्त झाले की जाणा-या सेवा रस्त्यालगतचे झाड शेतक-याच्या ट्रॅक्टरवर पडले सुदैवाने प्रसंगावधान राखत झाडाखाली सावलीला उभे असणारे पुणे मुंबईला जाणारे प्रवाशी किरकोळरित्या जखमी झाले व काहीजण सुखरूप वाचले याची नेमकी जबाबदारी कोणाची एस टी महामंडळाची कि महामार्ग व्यवस्थापनाची यावरून वादंग सुरू झाले. घटनास्थळी पाचवडच्या सरपंच सौ. अर्चना विसापुरे, उपसरपंच कमलाकर गायकवाड पाटील, माजी उपसरपंच अजित शेवाळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले व आक्रमक झालेल्या पाचवड ग्रामस्थांना शांततेचे आव्हान करत आपल्या भावना मांडल्या.

दरम्यान या घटनेची माहिती भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांना मिळताच त्यांनी आपला फौजफाटा घटनास्थळी रवाना केला. या दरम्यान संतप्त झालेले ग्रामस्थ व पत्रकार यांच्यातील संवादानंतर वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सरपंच व अन्य ग्रामस्थांची चर्चा करून निष्ठाई केली आपल्या पातळीवर तातडीने निर्णय घेत खड्डे बुजवण्यासाठी संबंधीत ठेकेदारला सुचना केल्यानंतर एका तासात खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले व संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला.

अजित पवारांची सगळ्या खात्यांना तंबी, ऊसतोड कामगारांची काळजी घ्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी