36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून ओमप्रकाश शेट्ये यांची...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून ओमप्रकाश शेट्ये यांची नियुक्ती

टीम लय भारी

बीड : बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले ओमप्रकाश शेटये यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे बीड जिल्हावाशियांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आपल्याला राजकारणात रस नाही आपण शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करणार असे शेट्ये यांनी तेथील लोकांना सांगितले (Omprakash Shetty appointed as Private Secretary of Union Minister Bharti Pawar).

मी अहोरात्र रुग्णांची सेवा करतो. तसेच आपल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून त्यांना मदत करतो. आणि मिळवून दिलेल्या सेवेबद्दल लोक माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करतात असे ही शेटये म्हणाले. त्यांच्या स्नेहजनांच्या वतीने बीड येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी शेटये बोलत होते.

परप्रांतातून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे

‘दिल्लीचे पोलीस मुंबईतून अतिरेक्यांना अटक करीत होते, तेव्हा महाराष्ट्र ATS झोपा काढत होते का ?’

त्यांच्या या सत्कार समारंभात आयुष मंत्रालयाचे संचालक, शिवव्याख्याते शिवरात्न शेटे, मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे पाटील, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. रामेश्वर शिंदे, परभणी भाजपा उपाध्यक्ष सुभाषराव आंबट, सोमनाथराव बडे, उद्योजक राजाभाऊ निर्मळ, उदयसिंह दिख्खत इत्यादी मंडळी उपस्थित होती.

पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम सुरु होणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे दिली जबाबदारी 

Maharashtra will get enough doses, says Union minister Bharati Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी