33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसिनेमा‘ते माझे मार्गदर्शक...’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

‘ते माझे मार्गदर्शक…’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

टीम लय भारी

मुंबई : ‘सारेगमप लिटील चॅम्प’ या कार्यक्रमातून नावारूपाला आलेली आर्या आंबेकर नेहमीच एक गुणी गायिका म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडीयावर सतत आर्या आंबेकर एका प्रसिद्ध संगीतकाराला डेट करत असल्याची बातमी चर्चेत आहे. परंतु या चर्चेला आर्याने आता पूर्णविराम दिला आहे (Arya Ambekar is dating a famous musician is in the news End to rumors).

रजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

TMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत उत्तर

या चर्चेवर बोलताना अर्याने पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, प्रारंभी मी यासगळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते. एका प्रश्नोत्तरांच्या सेशन मध्ये मला ह्या बाबत विचारण्यात आले, शिवाय माझ्या ओळखीच्या लोकांनीदेखील या गोष्टींवर चर्चा केल्या. त्यामुळे मी या गोष्टीचा खुलासा करायचा ठरवले आहे. पुढे या गोष्टींचा खुलासा करत ती बोलली की, गेल्या 12 वर्षांपसून कोणतीही एजन्सी मला मॅनेज करत नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑरगॅनिक आहेत. यूट्यूबवरील सबस्क्रयबर आणि सबस्क्राईबर आणि व्ह्यूजदेखील ऑरगॅनिक आहेत.  हे विकत घेणे मला मान्य नाही, उलट मी ह्याच्या विरोधात आहे. प्रमोशन आणि कार्यक्रमांसाठी मी थेट संवाद साधते. स्वतः सर्व मेल्स आणि मेसेजेस ला उत्तरे देते (Arya Ambekar interact directly for promotions and events. Answers all mails and messages himself).

एका प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला मी डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे, ही अफवा मी अनेक दिवसांपासून ऐकत आहे. परंतु मी सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छिते की ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी कायम त्यांचा आदर केला आहे आणि कायम करत राहीन. असे आर्याने तिच्या पोस्टमध्ये मांडले आहे (Arya Ambekar dating a famous singer and musician There has been talk on social media).

उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर 19 बंगल्यांचा घोटाळा केला : किरीट सोमय्या

Aarya Ambekar shares a BTS video of Man Udu Udu Jhala; says, “It was a learning experience”

ज्या कार्यक्रमात आर्या गायली, त्याच कार्यक्रमाच्या पर्वाचे ती आता परिक्षण करीत आहे. गायना सोबत तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले केल्याने तिला अधिक लोकप्रियता मिळाली (Arya Ambekar is now examining the festival of the same event where she sang).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी