30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमाणच्या उत्तरेकडील 32 गावांची भाजपाकडून दिशाभूल; प्रशांत विरकर यांचा आरोप

माणच्या उत्तरेकडील 32 गावांची भाजपाकडून दिशाभूल; प्रशांत विरकर यांचा आरोप

माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे व भाजप सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कोणत्याही उपसा सिंचन योजनेतून पाणीपूरवठा देण्याच्या नावाखाली माण तालुक्यातील माण नदीच्या उत्तरेकडील 32 गावांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी केला आहे.

विरकर म्हणाले की, माण तालुक्यातील वारुगड ते धुळदेव यामधील तोंडले बिजवडी येळेवाडी पांगरी पाचवड राजवडी शिंगणापूर दानवलेवाडी वावरहिरे थदाळे डंगिरवाडी मोही सोकासन मार्डी शंभुखेड हवालदारवाडी सह इत्यादी गावांचा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कोणत्याही उपसा सिंचन योजनेत समावेश नसताना देखील खोट्या भूलथापांच्या आश्वासनाच्या जीवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम आमदार महाशयांनी चालवलं आहे.

काल परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार महाशयांनी माणच्या उत्तरेकडील 32 गावांचा जिहे कटापूर योजनेत नव्याने समावेश केल्याच्या बतावण्या केल्या व त्यामध्ये गावांची नावे नमूद करत असताना ही गावे माणच्या पूर्वेकडील माण नदीच्या काठच्या गावांचा उल्लेख करून पूर्वीच जी गावे या योजनेत समावेश आहेत अशा गावांचा उल्लेख करून मागच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेकीचं काम केलं आहे. त्यांनी नमूद केलेली गावे ही माणच्या उत्तरेकडील नसून पूर्वेकडील आहेत. जनतेची दिशाभूल करताना त्यांना दिशांचा सुद्धा विसर पडलेला दिसतोय, असा हल्लाबोल प्रशांत विरकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबईतील 40 वर्षे जुन्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

WTC नंतर आता टीम इंडियाची नजर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकवर

दर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

त्याचबरोबर ज्या फडणीसांनी 2014 ला बारामतीत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो अशी वल्गना केली होती त्या घोषणेचा फडणवीसांना विसर पडला आहे. त्यांनी त्याबाबत माण तालुक्यातील धनगर समाजाला उत्तर द्यावे. त्यामुळे आज दहिवडी येथे होणारा कार्यक्रम हा आमदारांच्या बोगस भूलथापांचा सोहळा असल्याचे स्पष्ट होत असल्याचे विरकर यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी