30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसह राज्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान खात्याचा अंदाज

मुंबईसह राज्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याचे गेल्या काही दिवसातील पावसाचे अंदाज चुकलेले असताना हवामान खात्याने पुन्हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार उद्या, २२ जूनला मुंबईत मध्यम तर २३ व २४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, हवामान खात्याच्या सततच्या बदलणाऱ्या अंदाजामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जून महिना संपेल दहा दिवस शिल्लक आहेत, असे असताना पाऊस गैरहजर आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मात्र, येत्या चार दिवसांत वातावरणात बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले असून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम असल्या तरीही २३-२४ जूननंतर विदर्भालादेखील उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. येथेही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ जूनला कोकणात मूसळधार पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा 
वैष्णवांची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेचा बाजार चीन काबीज करतेय

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

कमला मिलमध्ये लिफ्ट कोसळल्यानं अपघात, 15 जण जखमी

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातदेखील हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वर्तवण्यात आला असून, राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवावा का, यावरूनही खात्याला ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, दरवर्षी साधारण ७ जूनला राज्यात पावसाचे आगमन होत असते. त्यामुळे शेतकरी पेरणीची कामे हाती घेत असतो, पण यंदा पावसाने चांगलीच ओढ लावल्याने पेरणीची कामे तर खोळंबली आहे, शिवाय जुलै महिन्यात पाऊस आला आणि त्याने अचानक गैरहजेरी लावली तर करायचे काय, या विवंचनेत शेतकरी आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी