30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रनागरिकांनी दिवाळीत फटाके वाजू नयेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

नागरिकांनी दिवाळीत फटाके वाजू नयेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे ( Rajesh Tope appealed to people ).

मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत आज चर्चा झाली. फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण लोकांनी फटाके वाजवू नयेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बहुतांश मंत्र्यांमध्ये सहमती झाली आहे. त्यामुळे लोकांनी फटाके वाजवू नयेत, असे आवाहन टोपे यांनी केले ( Rajesh Tope said, celebrate diwali without crackers ) .

फटाकेवर बंदी घालण्याबाबतही कदाचित चार – पाच दिवसांत निर्णय होऊ शकतो, असेही टोपे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

राजेश टोपे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांवर नाराज

Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

आज ‘कोविड टास्क फोर्स’ व ‘डेथ ऑडीट कमिटी’ची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. युरोप, अमेरिकेत ५ ते १० पटीने कोरोनाच्या रूग्णांमद्ये वाढ होत असल्याची चिंता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाके वाजवू नये, याबाबत संयुक्त बैठकीत चर्चा झाल्याचे टोपे म्हणाले.

लोकांनी सोशल डिस्टन्शिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर याची काळजी घ्यावीच. दिवाळीत फटाकेही वाजवू नयेत. फटाक्यांमुळे धूर होतो. हा धूर पार वर जात नाही. फटाक्यांच्या धुराचा श्वसन संस्थेला त्रास होतो. त्यामुळे फटाके वाजविणे योग्य ठरणार नाही, असे टोपे म्हणाले.

दिल्ली व पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी फटाके बंदीचा निर्णय घेतला असल्याचाही उल्लेख टोपे यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी