31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सरकार मुद्दाम मुंबईतील रेल्वे सुरू करीत नाही : विजय वडेट्टीवार

मोदी सरकार मुद्दाम मुंबईतील रेल्वे सुरू करीत नाही : विजय वडेट्टीवार

टीम लय भारी

मुंबई :  मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. पण गाड्या सुरू करण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी मोदी सरकार मुद्दाम रेल्वे सुरू करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ( Vijay Wadettiwar attacks on Narendra Modi Government ).

सर्वसामान्य लोकांनाही रेल्वे प्रवास सुरू करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला चार वेळा पत्रे लिहिली आहेत. प्रवासाच्या वेळा, विविध रंगाचे पासेस अशा सगळ्या बाबी रेल्वेला कळविण्यात आल्या आहेत. तरीही गर्दीचे कारण देत रेल्वे प्रशासन प्रवासाला परवानगी देत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले ( Vijay Wadettiwar said, we have written 4 letters to Railway ).

हे सुद्धा वाचा

नागरिकांनी दिवाळीत फटाके वाजू नयेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मोदी सरकार नेस्तनाबूत होईल : बाळासाहेब थोरातांचा निशाणा

…सरकारने अर्णबची गचांडी पकडली असे प्रकरण नाही;शिवसेनेचा टोला

रेल्वे गाड्या सुरू करण्याचे श्रेय राज्य सरकारला मिळू नये. हे श्रेय केंद्र सरकारलाच मिळाले पाहीजे असा अट्टाहास मोदी सरकारचा आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक रेल्वे गाड्या सुरू केल्या जात नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले ( Farmers will get help by Diwali ).

राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अडचण होती. परंतु याबाबत निवडणूक आयोगाकडून सल्ला घेता होता. आयोगाने शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

दिवाळीनंतर रेल्वे गाड्या सुरू होतील

सामान्य लोकांसाठी मुंबईतील उपनगगरीय रेल्वे गाड्या कधी सुरू होणार या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही आज प्रतिक्रिया व्यक्त केली. दिवाळीनंतर अनेक व्यवहार सुरू होतील, असे टोपे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी