29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्ररेमडिसीवर आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्बंध

रेमडिसीवर आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्बंध

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात रेमडिसीवर इंजेक्शन आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडिसीवर इंजेक्शन आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत (Some restrictions have been imposed on remedies to prevent the black market of injections and toxilizumab injections).

राज्यात रेमडिसीवर इंजेक्शन आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे (The black market of injections and tocilizumab injections on remedies has started in the state). एप्रिलमध्ये साठेबाजी आणि काळबाजाराच्या काही घटना घडल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी या इंजेक्शनचे वाटप आणि नियंत्रण सध्या कलेक्टरांच्या माध्यामातून केलेले आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

“कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती

More Indian children are getting infected with coronavirus in the second wave

पूर्वी या इंजेक्शनचा काळाबाजार हा उत्पादक, स्टोकिस्ट, होलेसेलर, डिस्ट्रीबुटर, रेटेलर ते मेडिकल स्टोअर यांच्या माध्यामातून काळाबाजर मोठ्या प्रमाणात घडला आहे. परंतु काळाबाजार रोखण्यासाठी आता कलेक्टरांच्या नियंत्रणाखाली उत्पादक ते थेट कोव्हीड सेन्टर असा प्रवास होत असल्याने बाजारात कुठेही इंजेक्शन मिळणार नाही.

तरी ही काही रुग्णालयात अनैतिक पद्धती (Unethical Practices) सुरू आहेत आणि त्यांच्या रुग्णालयात रोजचा कोटा शिल्लक असून ही ते नॉर्मल पेशंटला सुध्दा ते सरासपणे देत आहेत. काही रुग्णालायत पेशंटला 6 किंवा 10 इंजेक्शन प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जाते. पेशंट्सच्या नातेवाईकांची फसवणुक करून हे इंजेक्शन त्यांना २० ते ३० हजारात विकत घ्यावे लागते.

पेशंट्सच्या नातेवाईकांनी ही दक्षता घ्यावी

त्या संबंधित डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला वरील कार्यपद्धती/नियम सांगून त्याच हॉस्पिटलमधून नियमानुसार इंजेक्शन द्यायला भाग पाडावे.

तरीही ते दाद देत नसल्यास कलेक्टर ऑफिसमधील संबंधित अधिकाऱ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये फोन करण्याची विनंती करावी.

तरीही यश मिळाले नाही तर ते प्रिस्क्रिप्शन घेऊन त्या परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणे. या बॅड आणि अनैतिक पद्धती (Unethical Practices) विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा (Disaster Management Act) खाली गुन्हे दाखल करण्याचीही तरतूद आहे.

पेशंट्सच्या नातेवाईकांनी पेशंटचा HR CT स्कोर पाहावा

  • 1 ते 7/25  असल्यास तो नॉर्मल पेशंट असतो,
  • 8 ते 16/25 असल्यास MODERATE असतो आणि
  • 17 ते 25/25 असल्यास तो SEVERE असतो..

पेशंट्सच्या नातेवाईकांनी ही काळजी घ्यावी

आयसीएमआर/आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणे नॉर्मल पेशंट्सना रेमेडिसीवर किंवा टॉसिलीझुमाब / ऍक्टेंमरा किंवा टॉसिलीझुमाब इंजेक्शन देता येत नाही, पेशंट MODERATE TO SEVERE जाऊ नये म्हणून त्याला आणि SEVERE ICU पेशंट्सना द्यावे लागते.

वरील सर्व गैरप्रकार फक्त काही मोजक्या रुग्णालयातच सुरू आहेत, सर्वच ठिकाणी नाही. बरेच खाजगी रुग्णालय खूप चांगली सेवाही देखील देत आहेत.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी