32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयलसीकरणाचा डेटा सार्वजनिक करू नका या केंद्राच्या आदेशावर नवाब मलिकांचा सवाल

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करू नका या केंद्राच्या आदेशावर नवाब मलिकांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :-  केंद्र सरकारने (Central Government) कोरोना लसीकरणा (Vaccination) संदर्भातील माहितीचा डेटा सार्वजनिक करू नका असा आदेश राज्यांना दिला आहे. परंतु किती लस राज्यांना दिली आणि किती लसीकरण (Vaccination) झाले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. ही माहिती लोकांपासून का लपवायची असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केला आहे.

किती लस आली, किती लोकांना लसीकरण (Vaccination) करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्र सरकारने (Central Government) दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण (Vaccination) केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असेही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले.

माजी IAS चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, राहुल गांधीचा केंद्र सरकारला खोचक टोला

India’s new vaccine policy makes welcome improvements – but big questions still remain

केंद्र सरकारने (Central Government) 12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. दहा दिवस उलटून अकरावा दिवस उजाडला तरी केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र सरकार (Central Government) फक्त घोषणा करते त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्र सरकार (Central Government) अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा (Vaccination) डेटा सार्वजनिक करु नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. पण, हा दावा तथ्यहिन असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१,७०२ नवे रुग्ण; मृतांचा आकडाही वाढला

देशात गेल्या २४ तासांत ९१,७०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत होते. हा आकडा अगदी ६० हजारापर्यंत खाली गेला होता. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

आता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा ९०  हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. पण, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १,३४,५८०  इतकी आहे.

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच’

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या फोटोला आक्षेप असल्याचे म्हटले आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी