30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात लाखोंची उलाढाल

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात लाखोंची उलाढाल

बकरी ईदला बोकडाची कुर्बानी दिली जाते. मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात बोकडांची खरेदी केली जाते. येत्या 29 जूनला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने नांदगाव मधील आठवडे बाजारात बोकड खरेदी-विक्रीसाठी उलाढाल लाखोंच्या घरात होताना दिसली. इस्लामिक मान्यते नुसार मुस्लिम बांधव बकरी ईदला बोकडची कुर्बानी देतात. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नांदगावच्या बाजारात बकरे विक्रीसाठी आणले गेले होते. नांदगाव बाजार समितीत लाखोंची उलाढाल बोकड खरेदी-विक्री साठी झाली आहे. पाच हजार रुपयापासून ते 40 हजार रुपायपर्यंत किमतीच्या बोकडाची मागणी आज बाजारात होती.

बकरी ईदला मुस्लिम बांधव त्यांना प्रिय असणारी एक गोष्ट अल्लाह साठी कुर्बान करतात. इस्लामिक मान्यते नुसार ही प्रथा पडली आहे. बोकडाची कुर्बानी देऊन त्याच्या मासाचे तीन भाग करतात त्यातील एक हिस्सा स्वत: साठी तर दोन हिस्से गरीब मुस्लिम बांधवांच्या घरी देण्याची प्रथा आहे. काही दिवसांपूर्वी चाकण मध्ये झालेल्या बोकड बाजारातही मोठ्या प्रमाणात बोकड विक्री करण्यात आले आहेत. शनिवारी चाकण येथे बोकड बाजारात 1910 बोकड विक्री करण्यात आले असे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. चाकण बाजारात चांद ची खून असलेल्या बोकड विक्री करण्यात आला त्याची किंमत 80 हजार रुपये होती. तर शेळ्या मेंढया व बोकडांच्या बाजारात 3 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी सांगितले आहे.

हे सुध्दा वाचा:

राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा संभाजीनगरमधील मुस्लिमांचा क्रांतिकारी निर्णय

माणच्या उत्तरेकडील 32 गावांची भाजपाकडून दिशाभूल; प्रशांत विरकर यांचा आरोप

यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आले आहेत. राज्यात सध्याची परिस्थिति पाहता सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितित महत्वाची बैठक पार पडली आली आहे. याबैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थितित होते. बकरी ईदच्या सुरक्षा योजनांवर चर्चा करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी