33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या पुढाकाराने बारामतीसह इतर शहरांत IT सेंटर सुरु

शरद पवारांच्या पुढाकाराने बारामतीसह इतर शहरांत IT सेंटर सुरु

टीम लय भारी

बारामती : Capgemini या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. व बारामतीसह इतर शहरांत नवी आयटी सेंटर्स चालू करण्याबाबत निर्णय या बैठकीत झाला (Sharad Pawar took initiative, IT centers were started in some cities including Baramati).

यावेळी बारामती, कर्जत-जामखेड, नगर,सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये IT सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली.

१९ वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना यश

शरद पवारांच्या पुढाकाराने बारामतीसह इतर शहरांत IT सेंटर सुरु

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

यावेळी या शिष्टमंडळाने विद्या प्रतिष्ठान आणि ‘ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ला भेट देऊन विविध प्रकल्पांचीही माहिती घेतली. विद्या प्रतिष्ठान,ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,कृषी विज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून शिक्षण,कृषी-तंत्रज्ञान, डेअरी आदी क्षेत्रात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत सुरू असलेले विविध प्रकल्प आणि त्याचा राज्यावर होणारा परिणाम हे पाहून याशिष्टमंडळाने समाधान व्यक्त केलं.

यामध्ये कंपनीच्या CEO अश्विनी यार्डी, कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष जगदीश कुचम आणि कुमार अनुराग प्रताप यांचा समावेश होता. ही माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.

Sharad Pawar
शरद पवारांच्या पुढाकाराने बारामतीसह इतर शहरांत IT सेंटर सुरु

नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

 

‘Anil Deshmukh demanded Rs 2 cr to convince Pawar for reinstatement’: Sachin Vaze told ED

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी