34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसोलापूर शहरातील ५०० एकर जमिनीवर उभारणार ऑक्सिजनयुक्त वनउद्यान : सुधीर मुनगंटीवार

सोलापूर शहरातील ५०० एकर जमिनीवर उभारणार ऑक्सिजनयुक्त वनउद्यान : सुधीर मुनगंटीवार

सोलापूर शहरातील ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी पाचशे एकर वनजमिनीवर वनउद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर्नाटकातील विजयपूर येथे निवडणूक दौऱ्यासाठी रवाना होताना मुनगंटीवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सोलापूर शहरात शुध्द हवा देणारे प्रेक्षणीय स्थळ उभारण्याची माजी मंत्री सुभाष देशमुख यांची मागणी लक्षात घेता, शहरातील वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीवर ऑक्सिजनयुक्त शुद्ध हवा देणाऱ्या वन उद्यानाची निर्मिती केली जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाविकांना तृप्त मनाने अध्यात्मिक प्रबोधन, किर्तनाचा आनंद घेता येण्यासाठी पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी सरकारने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

दिल्लीश्वरांच्या मर्जीमुळे मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी ?

माळढोक पक्षी संवर्धनासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. माळढोक पक्षांची संख्या वाढविण्यासह इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात वन खात्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नागपूर येथे दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी