33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनकिम कार्दशियन सारखी दिसणाऱ्या क्रिस्टीना एश्टनचा मृत्यू; जगभरातील चाहत्यांना धक्का

किम कार्दशियन सारखी दिसणाऱ्या क्रिस्टीना एश्टनचा मृत्यू; जगभरातील चाहत्यांना धक्का

जगप्रसिद्ध मॉ़डेल आणि रिएलिटी स्टार किम कार्दशियन सारखी दिसणारी मॉडेल क्रिस्टीना एश्टन गोरकानी हिचे  निधन झाले. क्रिस्टीनाच्या कुटुंबियांनी तिच्या निधनाची माहिती दिली. 34 वर्षीय क्रिस्टीनाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्लास्टिक सर्जरीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज देखील अनेकांनी वर्तवला आहे.

क्रिस्टीनाच्या नि्धनाचे वृत्त समोर येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तीच्या अचानक मृत्यूमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. क्रिस्टीनाचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत.


क्रिस्टीनाची देहयष्टी किम कार्दशियनसारखी असल्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियात होता. तिचा स्वत:चा देखील मोठा चाहतावर्ग होता. मात्र अवघ्या 34 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाला. 26 एप्रिल रोजी तिच्या कुटुंबियांनी तिच्या निधनाची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

अविनाश भोसले यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..! 

क्रिस्टीनाच्या कुटुंबियांनी सांगितले की, उपचारा दरम्यान तिची प्रकृती खालावत गेली. तिच्या मृत्यूचे कारण देखील शोधले जात आहे. क्रिस्टीनाच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून तिच्या चाहत्यांनी तिच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी