33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसूडबुद्धीने राजकारण करत निरपराध तलाठी उत्तम म्हस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई

सूडबुद्धीने राजकारण करत निरपराध तलाठी उत्तम म्हस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई

टीम लय भारी

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील मौजे मांडवे इथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले उत्तम म्हस्के यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची प्रारंभिक चौकशी न करता सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचे म्हस्के यांचे म्हणणे आहे (Solapur : Suspension action against innocent Talathi Uttam Mhaske).

उत्तम म्हस्के रजेवर असताना त्यांच्या निलंबनाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे रजेवर असताना निलंबन अहवाल कसा सादर केला. तसेच काढण्यात आलेल्या दहा दोषारोपांपैकी एकही दोषारोप सिद्ध झाले नाही. त्या उलट सादर करता अधिकारी म्हणून तत्कालीन तहसीलदार सुरेखा दिवटे या जाणीपूर्वक चौकशीमध्ये गैरहजर राहिल्या. ही बाब जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आली असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!

NCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा : संजय राऊत

तसेच मौजे दहिगाव येथे कार्यरत असलेले तत्कालीन तलाठी यांनी त्यांच्या काळात दप्तरात खाडाखोड केले. त्यानंतर ते दोन वर्षांसाठी बेपत्ता होते. याबद्दल सुरेखा दिवटे यांनी वरिष्टांना का कळवले नाही? तसेच त्यांच्या निलंबनाचा अहवाल वरिष्टांना का पाठवला नाही ? असा प्रश्न म्हस्के यांनी केला आहे.

अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत; संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

Maharashtra Covid toll rises, 27% infections in Mumbai alone

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी