31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी शुक्रवारी, (27 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कंत्राटी भरती रद्द करण्याबाबत सरकार खोटे बोलत असून काही विभागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठी केली जाणारी भरती यापुढेही सुरू राहणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने सरकार कडे काही मागण्या करण्यात आल्या असून संपूर्ण प्रश्न मार्गी न लावल्यास हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार असल्याचे सुजात आंबेडकर ह्यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.तसेच शाळा खाजगकरणाच्या निर्णय घेतला गेला असून पेपरफुटी विरूद्ध कठीण कायदा नाही, परीक्षा शुल्क प्रचंड वाढविले असून संपूर्ण प्रश्न मार्गी न लावल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढण्यात येणार आहेत.


सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले, “गेले काही महीने महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटतोय. तो म्हणजे, स्पर्धा परीक्षा रद्द करण्याचा, पेपरफुटीचा, आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरतीचा. याच्याविरोधात, वंचित बहुजन आघाडीने आणि वंचित बहुजन युवा आघाडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. लातूर, सांगली, नांदेड, परभणी आणि अकोला येथे आंदोलने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कंत्राटी भरतीचे पाप पूर्वीच्या सरकारचे असून आम्ही ते रद्द करत आहोत.’ असे सांगितले होते. उपमुख्यमंत्र्यांनी जरी हे सांगितले असले तरी अजूनही कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्याचे काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे. नुकत्याच मुंबईमध्ये 3000 पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने झाली होती. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती सुरूच आहे. जोपर्यंत, विधानसभेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द होण्याबाबत विधेयक पास होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि विद्यार्थ्यांचे हे आंदोलन थांबवण्यात येणार नाही. यासाठी आम्ही सरकारला इशारा देतोय की हे आंदोलन अजून मोठं करण्यात येईल.” असा इशारा सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला.

हे ही वाचा 

शिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

धनगर मेळावा जेजुरीत धडकणार; ‘या’ मुद्यांवर चर्चा होणार

जयंत पाटील म्हणतात, काम माझे; श्रेय घेताहेत नरेंद्र मोदी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सरकारकडे प्रमुख मागण्या 

  1. कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, नुसती घोषणा न करता तात्काळ शासन निर्णय काढून सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी.सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे.
  2. स्पर्धा परिक्षेसाठी वाढीव फी रद्द करण्यात यावी.
  3. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा.त्यात अजामीनपात्र व राज्याचे विरुद्ध द्रोह केल्याचे कलम समाविष्ट करावे.
  4. राजस्थानच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क (OTR) आकारण्यात यावे.तसेच ह्या परीक्षा लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात याव्यात.
  5. जि.प.शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा.
  6. सर्व शासकिय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्यात यावी.
  7. राज्यसेवा व सरळसेवा पदभरती MPSC च्या मार्फत करण्या साठी आयोगाला अध्यक्ष व इतर अधिकारी मोठ्या संख्येत नियुक्त करावे.
  8. KG to PG सर्वांना मोफत शिक्षण मिळावे.शिक्षणाचे खाजगीकरण तातडीने थांबवावे.
  9. केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे.
  10. शिक्षण हक्क कायद्यानुसार 1 ली ते 10 वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करून ह्या आधी शिक्षण दिलेल्या शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा करावी.
  11. प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी तात्काळ वितरीत करवा.तसेच महागाई निर्देशांकानुसार त्यात वाढ करावी.
  12. शासकिय वस्तीगृहातील भत्ता 1500 रु व स्टेशनरीमध्ये वाढ करावी.
  13. शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम रद्द करण्यात यावे.सरकारने हिवाळी अधिवेशन पूर्वी हे प्रश्न मार्गी लावले नाही तर हिवाळी अधिवेशन वर सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, शिक्षण संस्था चालक स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक ह्यांना घेवून युवा आघाडी दणका मोर्चा काढणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी