33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून सातारा जिल्ह्यातील 'या' नेत्यांना गावबंदी

मराठा आरक्षणावरून सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्यांना गावबंदी

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत, उपोषणही केले जात आहे. अनेक वर्षे किती सरकार आले अन् गेले?, मात्र मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? मराठा समाजातील अजून किती लोकं आत्महत्या करत आपले जीवन संपवून परिवाराला वाऱ्यावर सोडणार आहेत. राजकीय नेते जातीपातीचे राजकारण करत आपल्या पोळ्या भाजत आहेत. दरम्यान, मराठा आंदोलक योद्धा मनोज जरांगे-पाटील एका सभेत राजकीय नेत्यांना गावबंदी करा, असा आदेश मराठा बांधवांना दिला असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या आदेशाचे पालन देखील करण्यात आले आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत ४० दिवसांची मुदत जरांगे-पाटलांनी दिली होती. मात्र ४० दिवस उलटून गेले तरीही राज्य सरकार काहीच करू शकले नाही. यामुळे जरागेंनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे (२५ ऑक्टोबर) उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपोषणाच्या दिवशी जरागेंना भाजप नेते गिरीश महाजन यांचा फोन आला होता. ते जरांगेंना उपोषण न करण्याचा आग्रह करत होते. मात्र जरांगेंनी त्यांचे ऐकले नसून पुन्हा उपोषणास सुरूवात केली. राजकीय नेते निवडणुकांच्या तोंडावर आरक्षण, जातीपातीचे राजकारण करतात. अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने करतात, मात्र मराठा समाजाला कोणतेच सरकार आरक्षण देत नाही. निवडणुकांचा वेध घेऊन फक्त आरक्षण देण्याचे आश्वासन देतात. यासाठी आता राजकीय नेत्यांना राज्यातील काही गावात मराठा आरक्षण मिळत नाही तोवर राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली.

हे ही वाचा

सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

‘मी माझ्या पगारावर समाधानी’; साताऱ्यातील सरकारी अधिकाऱ्याच्या फलकाची चर्चा

आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

माण तालुक्यातील ‘या’ ठिकाणी गावबंदी

माण-खटाव या तालुक्यातील ६ गावांमध्ये मराठा आरक्षण जोवर मिळत नाही, तोवर राजकीय नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहीती समोर आली आहे. माण तालुक्यातील कोळेवाडी, पांढरवाडी, महिमानगड, उर्कीडे, दिवडी, स्वरूपखानवाडी या गावातील मराठा समाजाने जरांगे-पाटलांनी राजकीय नेत्यांना गावबंदीबाबत दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे. आमदार, खासदार तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात यावी, असे निवेदन मराठा समाजबांधवांनी ग्रापंचायत,तहसिलदार यांना केले आहे. जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर मतदानावर बहिष्कार टाकला.

काय आहे निवेदन?

माण तालुक्यातील मराठा समाजाने महिमानगड येथील बस स्टॅंडजवळ एकत्र येवून हा निर्णय घेतला आहे. यावेळी सहा पक्षांच्या राजकीय नेत्यांना गावबंदी करावी. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाने आंदोलन केले आणि निवेदनही केले आहे. मात्र सरकारने अजूनही मराठा आरक्षण दिले नाही. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे सहा राजकीय पक्षांच्या नेत्यांना महिमानगड आणि इतर पंचक्रोशीतील गावांमध्ये गावबंदी केली. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना नो एन्ट्री पाहायला मिळते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी