34 C
Mumbai
Sunday, June 2, 2024
Homeराजकीयधनगर मेळावा जेजुरीत धडकणार; 'या' मुद्यांवर चर्चा होणार

धनगर मेळावा जेजुरीत धडकणार; ‘या’ मुद्यांवर चर्चा होणार

राज्यात काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. ४० दिवसांनंतर सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबात तोडगा काढण्याचे काम करु असे आश्वासन दिले होते. ४२ दिवस होऊनही गेले मात्र काहीच तोडगा नाही. यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणास सुरू केले. याचबरोबर आता इतरही समाजबांधवांनी आरक्षणासाठी मागणी केली आहे. दरम्यान, धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन डोकं वर काढले आहे. धनगर एसटी आरक्षण- ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, यासाठी २९ तारखेला जेजुरी येथे मेळावा घेण्यात येणार आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या धोरणाने प्रेरित असा हा मेळावा असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

राज्यात एका बाजुला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जात नाही. तर धनगर समाजाला एससी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी आटापिटा करावा लागत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आंदोलन उपोषण होत आहे. तर यावेळी धनगर एसटी आरक्षण-ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने जेजुरी येथे मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळव्यात धनगर समाज आरक्षणासोबतच स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महाराजा यशवंतराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, शिवा काशिद, जीवा महाला यांची स्मारके ही राज्य आणि राष्ट्रीय स्मारके व्हावीत याबाबत मेळाव्यात चर्चा होणार आहे.

हे ही वाचा

जयंत पाटील म्हणतात, काम माझे; श्रेय घेताहेत नरेंद्र मोदी

चंद्रशेखर बावनकुळे पालघरमध्ये कडाडणार!

मुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य समोर!

या मुद्द्यांवर होणार चर्चा

ओबीसी भटक्या विमुक्तांचा सत्तेमधील म्हणजेच निर्णय प्रक्रियेमधील न्याय वाटा नाही. यावर देखील चर्चा होणार आहे. राज्यातील बदलती सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता गरीब कष्टकरी शेतकरी, कामगार, पशुपालक, मेंढपाळ, भूमिपुत्र यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत.

मेंढपाळ आणि भटक्या जमातीवरील वाढते सामूहिक हल्ले आणि त्यावर आवाज उठवणे, वन विभागाचा त्रास, परप्रांतीय मच्छीमारांचे संकट, ऊसतोड कामगार प्रश्न आदी विषयावर या मेळाव्यातून आवाज उठविला जाणार आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी संत बाळुमामा जयंतीचे औचित्य साधून विशेष गोड बातमी दिली जाणार आहे. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी आवाहन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी