31 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरराजकीयशिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

शिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील नाशिक येथील शिर्डी येथे येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यामातून शिर्डी दौऱ्यावर येणार असल्याची माहीती दिली होती. ते (२६ ऑक्टोबर) दिवशी शिर्डीला दुपारच्या वेळेस आले. सर्वात आधी त्यांनी शिर्डींच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी अर्धा तास मंदीर रिकामे ठेवण्यात आले होते. पाद्यपुजन करत त्यांनी विधीवत पुजाही केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी अकोले येथे वाटचाल केली. त्यानंतर त्यांची काकडी गावात सभा भरवण्यात आली.

देशवासियांचेश्रद्धास्थान शिर्डींच्या साईबाबांचे दर्शन घेत,मोदींनी पाद्यपुजन करत अकोलेकडे रवाना झाले. २००८ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तर २०१८ ला देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आणि २६ ऑक्टोबरला मोदी शिर्डीत आले आहेत. तर या नंतर त्यांनी अकोले येथील निळवंडे धरणाच्या कालव्याचे उद्घाटन केले. यानंतर हेलिकॉप्टरद्वारे धरणाची त्यांनी पाहणी केली आहे. अकोल्यातील प्रवरा नदीवर निळवंडे या धरणाची बांधणी केली आहे. या धरणाची लांबी १९१२ आहे. तर उंची २४२ फुट आहे. या धरणाची बांधणी ही १९९९ मध्ये झाली. मुंबईपासून १८६ तर पुण्यापासून १६० आणि नाशिकपासून ७५ किमीचे अंतर आहे. दरम्यान, या ठिकाणाहून मोदी सभेसाठी काकडी या गावात गेले. यावेळी सभा सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हे ही वाचा

वारकरी संप्रदायावर शोककळा… ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

जयंत पाटील म्हणतात, काम माझे; श्रेय घेताहेत नरेंद्र मोदी

नवी मुंबईकरांचा मेट्रोप्रवास पुन्हा लांबणीवर.. वडेट्टीवारांचे सरकारवर टिकास्त्र

काय म्हणाले एकनाथ शिंदे

काकडी गावात सुरू असलेल्या सभेत एकनाथ शिदेंनी नाव न घेता टीका केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात जर नरेंद्र मोदी आले तर लगेच काहींच्या पोटात दुखू लागते. त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे. कोणत्याही कामाचे उद्घाटन केल्यास त्या कामास परीसस्पर्श होऊन तो प्रकल्प वायुच्या वेगाने जाऊन पूर्ण होतो. मोदी महाराष्ट्रात कोणत्याही कार्यक्रमास येतात. तेव्हा त्यांच्या पोटात दुखते त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात विनामूल्य उपचार सेवा सुरू आहेत. अशी मिश्कील टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.

यानंतर त्यांनी मागील सरकारच्या काळातील काही बाबी सांगितल्या आहेत. मागील दिड वर्षात विकास कामे बंद होती. मात्र आता आमचे सरकार आले आणि विकास कामांना चालना मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जे काही मागितले ते दिले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांचे हे पहिलेच भाषण होते.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी