31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालयाच्या निकाल अन्यायकारक, मशीद दुसऱ्यांना देता येत नाही : सुन्नी वक्फ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल अन्यायकारक, मशीद दुसऱ्यांना देता येत नाही : सुन्नी वक्फ बोर्ड

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अयोध्येमधील जमीन रामलल्लाची असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. परंतु हा निकाल समाधानकारक नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत आम्ही आता विचार करू. परंतु न्यायालयाचा निकालाचा आम्ही आदर करत आहोत, अशी भावना सुनी वक्फ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. न्यायालयाचे निकालाचा आम्ही आदर करीत आहोत. देशातील जनतेने शांतता राखावी. वातावरण चिघळणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हिंदूच्या आस्थेचे, पुजेचे जे पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत. तेच पुरावे मशिदीबाबतही आहेत. ते न्यायालयाने मान्य केलेले दिसत नाहीत. याचे आकलन आम्हाला अद्याप झालेले नाही. मशिदीत बदल होऊ शकत नाही. शारियत कायद्यानुसार मशिद कोणाला देता येत नाही. बक्षिस म्हणूनही देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नक्की कोणते पुरावे ग्राह्य धरले व कोणते ग्राह्य धरले नाहीत हे निकालपत्र वाचल्यानंतरच लक्षात येईल, असेही बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले.

न्यायालयाने नोंदविलेली अनेक निरीक्षणे उत्कृष्ट आहेत. संपूर्ण देशातील धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. देशातील जनतेने निकालाचा आदर करावा. देशात शांतता राखावी. कोणीही वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी