27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यात वादग्रस्त मॅसेज प्रकरणी दुस-या तरुणालाही अटक

धुळ्यात वादग्रस्त मॅसेज प्रकरणी दुस-या तरुणालाही अटक

लय भारी न्यूज नेटवर्क

धुळे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. धुळ्यात एका समाजकंटकाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली.

धुळ्यातील जुन्या आग्रा रोड परिसरातील काही दुकानांच्या भिंतीवर राजेंद्र मराठे याने ऑइल पेंटने जय श्रीराम असे लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राजेंद्र मराठे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याआधी धुळ्यातीलच गोरक्षक संजय शर्मा याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे त्याच्याविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली होती.

पोलिसांनी शांतता भंग होऊ नये म्हणून सर्वांवर करडी नजर ठेवली आहे. देशभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये. यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.

धुळे जिल्ह्यामध्ये २० नोव्हेंबरपर्यंत कलम 144(1)(3) लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये, समाज माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी, व्हिडीओ, संदेश पोस्ट करू नये असं आवाहन केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी