31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबीड जिल्हा हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर

बीड जिल्हा हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर

टीम लय भारी

बीड : बीडमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वेगाने वाढल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सुर्डी व सिरसाळ्यातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता चुंभळी या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून फासावर लटकवल्याची प्राथमिक तक्रार मयत मुलीच्या पित्याने दाखल केली आहे. यामुळे बीड जिल्हात मोठी खळबळ उडाली आहे (There is a big stir in Beed district).

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्याच घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये आढळून आल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावातून समोर आली आहे. मुलीच्या पित्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीवर बलात्कार करून तिला फासावर लटकवले गेल्याची तक्रार पाटोदा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. सध्या पोलिस वेगाने प्राथमिक तपास करत आहेत.

‘बचपन का प्यार’ फेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

भाल्याची पोहोच सुवर्णपदकापर्यंत, खणखणलं चक्क सोनं!

मुलीच्या पित्याने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवल्याची तक्रार दिल्याने हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या प्रकरणातील धागेदोरे सखोलपणे तपासण्यासाठी पोलिसांनी मयत चिमुकलीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यावर अंबेजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहेत (She will be autopsied at the Sub-District Hospital Ambejogai).

मयत मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीत गावातील एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. तसेच या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेलो होतो. गुरूवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जायची. यापूर्वीही त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याचे समोर आले होते.

There is a big stir in Beed district
गुन्हेगारी

इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नचे नामांकन यादीत ‘यांची’ वर्णी

Opinion: Amit Shah Silent On Horrific Crimes Against A 9-Year-Old In Delhi

गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतरही तो तरुण मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. दिनांक 5 ऑगस्ट रोजी आम्ही लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने घरात मुलगी एकटी होती या संधीचा फायदा घेऊन त्या तरुणाने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवले असावे असा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.

दरम्यान या घटनेचे गांभीर्य पाहता मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आला आहे. याठिकाणी इन कॅमेरा शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मयत मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. तिच्यावर अत्याचार झाला का  ? तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून त्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा बदनाम झाला आहे. बीडमध्ये महिला व मुलींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी