महाराष्ट्र

बाळासाहेब भवनमध्ये भरला उदय सामंत यांचा जनता दरबार!

जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा अग्रक्रम असल्याचे उद्योगमंत्री  उदय सामंत (Uday Samant) यांनी नुकत्याच घेतलेल्या जनता दरबारातून (Janata Darbar) स्पष्ट केले. मंत्रालयाच्या आवारात शिंदे गटाने बाळासाहेब भवन (Balasaheb Bhavan) उभारले असून याच बाळासाहेब भवनमध्ये मंत्री उदय सामंत यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्यासाठी देखील कार्यवाही केली. (Uday Samant Janata Darbar was filled in Balasaheb Bhavan) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे औद्योगिक परिसरात राहणाऱ्या लोकांच्या अनेक अडचणी घेऊन लोक येत असतात. तसेच त्यांच्या मतदार संघातील देखील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उदय सामंत तत्पर असतात. नुकताच त्यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे जनता दरबार भरविला होता. या जनता दरबारात त्यांनी राज्यभरातून आलेल्या नागिरकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी देखील त्यांनी प्राधान्यक्रम दिला.

उदय सामंत यांनी ट्विटरवर याबाबत एक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या अडचणी सोडविणे हे माझे प्राधान्यक्रम असून आज बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील शेकडो नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे. ज्या नागरिकांना मंत्रालय व शासकीय कार्यालयात येणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

Get out Ravi : तामिळनाडूत राज्यपालांविरोधात रान तापले

संतापजनक : शाहरुख खानच्या बायकोने मराठीची केली ऐसीतैशी!
जोगेंद्र कवाडेंना रामदास आठवलेंचा विरोध !

औद्योगिक परिसरातील अनेक समस्या, तसेच उद्योगधंदे, एमआयडीसी, मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी घेऊन नागरिक मंत्र्यांककडे येत असतात मात्र अनेकदा मंत्रालयात त्यांना ताटकळत रहावे लागते, अनेकदा त्यांना हेलपाटे घालावे लागतात, यात नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील जात असतो. त्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सहजपणे मांडता याव्यात, नागरिकांच्या समस्यांचा तातडीने निपटारा करता यावा यासाठी जनता दरबार भरवून लोकांच्या समस्या जलदगतीने सोडविण्यावर मंत्री उदय सामंत यांचा भर असतो.

गाव-खेड्यातून आलेल्या लोकांची फरफट होऊ नये, त्यांना योग्य ठिकाणी त्यांच्या अडचणी मांडता याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करता यावी म्हणून जनता दरबाराव्दारे लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सरकारमधील मंत्री करत असतात. मंत्री उदय सामंत यांनी देखील बाळासाहेब भवनमध्ये जनता दरबार घेत लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांच्या समस्या देखील मार्गी लावल्या.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

12 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

12 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

13 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

13 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

19 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

20 hours ago