30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रUlhasnagar News : 'या' ठिकाणी जाताहेत नागरिकांचे नाहक बळी

Ulhasnagar News : ‘या’ ठिकाणी जाताहेत नागरिकांचे नाहक बळी

पावसाळ्याच्या आधी धोकादायक इमारतींचा सर्वे करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते परंतु असे असून देखील अशा दुर्घटनाग्रस्त इमारतीत लोक कसे काय राहतात, प्रशासन सपशेल कसे दुर्लक्ष करते अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरे स्लॅब कोसळून जमीनदोस्त झालेल्या धुळीत शोधू पाहणाऱ्यांसाठी हे प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. 

दरवर्षी पावसाळ्यात इमारती, इमारतीचे भाग कोसळून अनेक दुर्घटना घडत असतात. दुर्घटनेनंतर आर्थिक मदत घोषित करून दुःखावर फुंकर मारल्यासारखे केले जाते परंतु परिस्थिती मात्र दरवेळी ‘जैसे थे’ असल्याचेच पाहायला मिळते. उल्हासनगर मध्ये आज स्लॅब कोसळ्याने त्याखाली चिरडून चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्षणासाठी काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना अनेक घटनांसारखीच असून याआधी सुद्धा अनेक वेळा उल्हासनगरमध्ये अशा घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे अशा घटना कधी थांबणार, कोण याकडे लक्ष देणार असा केविलवाणा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे कॅम्प क्रमांक पाचच्या परिसरातील ओटी चौकात आज मोठी दुर्घटना घडली. या चौकातील मानस टॉवर या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला असून चौथा, तिसरा मजला सुद्धा जमीनदोस्त झाला आहे. दरम्यान अचानक ओढावलेल्या या संकटात चार जणांना प्राण गमवावे लागले, तर यामध्ये एकजण जखमी झाला आहे. सदर घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar News people dies without reason

हे सुद्धा वाचा…

National Education Policy 2020: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत शिक्षणाचे जागतिक केंद्र बनेल – जे. पी. नडडा

Rahul Gandhi : राहूल गांधीनी दिला आपल्याच पक्षातील मोठया नेत्यांना सल्ला

Nirmala Sitharaman : राष्ट्रवादीचा गड फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला स‍ितारमण बारामती दौऱ्यावर

या दुर्घटनेत ढोलनदास धनवाणी, सागर ओचानी, रेणू धनवाणी आणि प्रिया धनवाणी अशा चार जणांचा यात मृत्यू झाला असून यात एक अज्ञात व्यक्ती जखमी झाला आहे. या जखमी व्यक्तीवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याआधी सुद्धा उल्हासनगरमध्ये 18 तारखेलाच साई दर्शन इमारतीच्या स्लॅब कोसळला होता आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या दोन घटनांपूर्वी सुद्धा अशा अनेक दुर्घटना उल्हासनगरमध्ये घडल्या आहेत. इमारतींचा स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत मात्र त्यावर उपाययोजनेच्या नावाने केवळ पोकळ बाता असल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे अशा दुर्घटना थांबणार कधी असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या आधी धोकादायक इमारतींचा सर्वे करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते परंतु असे असून देखील अशा दुर्घटनाग्रस्त इमारतीत लोक कसे काय राहतात, प्रशासन सपशेल कसे दुर्लक्ष करते अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरे स्लॅब कोसळून जमीनदोस्त झालेल्या धुळीत शोधू पाहणाऱ्यांसाठी हे प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी