33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रवसतिगृहातील अल्पवयीन मुलींचा शिक्षकांवर आरोप,पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला सांगतात

वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचा शिक्षकांवर आरोप,पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला सांगतात

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी व छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. शाळा आणि रिसॉर्ट हे एकाच मालकाचे आहे.

मुलींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेमुळे पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले. शाळेच्या मागाच्या टेकडीवर हॉटेल आहे.मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान जबरदस्तीने नाचण्यात सांगितले आहे, असा आरोप वसतिगृहातील मुलींनी केला आहे. पारंपरिक नृत्य आणि संगणकाचे शिक्षण देण्याच्या नावाखाली पंधरा दिवस आधीच वसतिगृहात प्रवेश करुन घेतला होता. वसतिगृहात संगणक शिक्षण दिले नसल्याचीही तक्रार मुलींनी केली आहे.

हे सुध्दा वाचा:

गद्दार दिनावरुन संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये कलगीतुरा

भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आझादच ! सुधीर मुनगंटीवार

ठाण्यात राष्ट्रवादीने 50 खोक्यांची होळी करत साजरा केला गद्दार दिन, माजी खाजदार आनंद परांजपे यांना अटक

मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक व तेथील शिक्षिकांनी धुडकावून लावला आहे. आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो, असे एका शिक्षिकेने सांगितले आहे. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी