33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयऔरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे ‘औरदंगाबाद’ आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे ‘औरदंगाबाद’ आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

प्रत्येक वेळेला निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर मग तिकडे जय बजरंग बली करायचं, कधी दाऊदचा चेहरा, तर कधी औरंगजेबाचा चेहरा वापरायचा, असं सगळं सुरू आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे हे ‘औरदंगाबाद’ आहेत, मी त्यांना ‘औरदंगाबाद’ म्हणतो. कारण यांना केवळ दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचा आहे. अशी जहरी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

राज्यात औरंगजेबावरून राजकीय वातावरण तापले आहे. सुरुवातीला औरंगजेबाच्या पोस्टरवरून राज्यात अनेक ठिकाणी राडे आणि दंगली उसळल्या. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी देखील सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीनंतर वंचितचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व विरोधक यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करू लागले आहेत. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला.

हे सुद्धा वाचा

वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचा शिक्षकांवर आरोप,पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला सांगतात

गद्दार दिनावरुन संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये कलगीतुरा

भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आझादच ! सुधीर मुनगंटीवार

उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. पण ते म्हणाले, जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी साहेब (भाजपाचे ज्येष्ठ नेते) जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्नाह) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्यााऐवजी नव्या विचारांसह पुढं जावं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी