31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजमहाराष्ट्राची माय काळाच्या पडद्याआड, अख्खा महाराष्ट्र हळहळला

महाराष्ट्राची माय काळाच्या पडद्याआड, अख्खा महाराष्ट्र हळहळला

टीम लय भारी

पुणे : सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.त्यांच्यावर महिन्यापूर्वीच हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे(Maharashtra’s ‘Mother’ passed away, Maharashtra is in turmoil).

त्यांना गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सिंधूताई यांचं समाजकार्याची जगभरात दखल घेतली गेलीय. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला.

मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं.लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांचं पालकत्व निभावलं. त्याचबरोबर त्यांनी अशा अनेक संस्थांमधून अनाथ बालकांची जबाबदारी खांद्यावर घेतली.

३० पेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांत प्राणवायू टाक्या बंधनकारक

Social worker Sindhutai Sapkal, ‘mother to thousands of orphans’, passes away

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी