31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयदूध दराबाबत उद्धव ठाकरे, अजितदादा, बाळासाहेब थोरात ‘महत्वाचा’ निर्णय घेणार

दूध दराबाबत उद्धव ठाकरे, अजितदादा, बाळासाहेब थोरात ‘महत्वाचा’ निर्णय घेणार

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी’ सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेणार आहे ( Mahavikas Aghadi government will bring new policy for milk producer ). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला की, ही योजना अंमलात येईल अशी माहिती पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : …तर शेतक-यांचे आंदोलन चिघळणार : राजू शेट्टी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन नवीन योजना घेऊन येणार आहे, असे ते म्हणाले. दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

Advt
जाहिरात

या बैठकीस पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी,  तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक,  बैठकीला व्हिडिओ काँन्फरन्सव्दारे सहभागी झाले होते.

advt
जाहिरात

मंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील विविध सरकारी आणि खासगी दूध संघांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या. शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी गंभीर असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

advt
जाहिरात

पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही प्रतिक्रीया व्यक्त केली. कोरोनाच्या या संकटप्रसंगी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य शासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघानेही कठीण परिस्थितीमध्ये जे शक्य असेल ती मदत व आपापल्या परीने करावी असे भरणे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी