31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमंत्र्याकडे 42 वेळा जाऊनही भेट नाही, सत्ताधारी आमदाराला मिळाला कटू अनुभव

मंत्र्याकडे 42 वेळा जाऊनही भेट नाही, सत्ताधारी आमदाराला मिळाला कटू अनुभव

टीम लय भारी

मुंबई : मंत्री, पुढाऱ्यांची भेट मिळणे सामान्य लोकांना बऱ्याचदा दुरापास्त असते. पण चक्क आमदारालाही मंत्र्यांची भेट मिळू शकत नाही. ते सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ! विशेष म्हणजे, तब्बल 42 वेळा कार्यालयाची पायधूळ झाडल्यानंतरही ही भेट झालेली नाही ( Mahavikas Aghadi Minister unviable for MLA ).

हतबल झालेल्या या आमदारांनी आपली नाराजी थेट विधानसभेच्या सभागृहातच मांडली. मी 42 वेळा जाऊनही मंत्र्यांची भेट झाली नाही, अशा शब्दांत या आमदारांनी आपला संताप व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना हा कटू अनुभव आला आहे ( Devndra Bhuyar angree on a Mahavikas Aghadi Minister ).

हे सुद्धा वाचा

कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, आमदार पाटील दादा भुसेंवर संतापले

भाजपकडून अहिल्यादेवी होळकरांची अवहेलना, धनगर समाजात नाराजी

आमदार धिरज देशमुख धावले गावकऱ्यांच्या मदतीला, विलासराव देशमुखांची करून दिली आठवण

From being banished to winning Morshi— how table turned for Devendra Bhuyar

याबाबत भुयार यांच्याकडून ‘लय भारी’ने संवाद साधला. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याविषयी आपणांस अतिशय कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले ( MLA Devendra Bhuyar angress on Minister K. C. Padvi )

माझ्या मतदारसंघात प्रकल्प कार्यालय सुरू करण्याच्या विनंतीसाठी मी पाडवी यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील होतो. त्यासाठी त्यांना तब्बल 42 वेळा भेटण्यासाठी गेलो ( MLA Devendra Bhuyar tried for 42 times to meet K. C Padvi ). याबाबतची तारीखवार माहिती मी देऊ शकतो. पण महोदयांची भेट झाली नाही. एके वेळी अर्थसंकल्पाबाबतची बैठक सुरू होती. त्यावेळी मी तिथे गेलो, व कसाबसा त्यांच्याशी बोलू शकलो.

– देवेंद्र भुयार

प्रकल्प कार्यालय सुरू व्हावे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाडवींना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पाडवी यांना याबाबत सांगितले आहे. पण के. सी. पाडवींनी त्यावर काहीही केलेले नसल्याचे भुयार म्हणाले ( K. C. Padvi not responded to Ajit Pawar and Yashomati Thakur ).

याबाबत के. सी. पाडवी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

मंत्र्यांना जबाबदारीचे भान हवे

काँग्रेसची महाराष्ट्रात बिकट स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा पक्ष सत्तेवर येईल असे कुणालाही स्वप्नात वाटले नव्हते. पण अनपेक्षितपणे काँग्रेसला सत्तेची लॉटरी लागली. सत्ता आली पण काही मंत्र्यांकडे अजून शहाणपण आलेले दिसत नाही. मंत्र्यांना आमदारांसाठी वेळ नसेल तर सामान्य लोकांना ते कसे न्याय देतील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत. ( Mahavikas Aghadi minister should take priority to conman people )

भाजपचा घातकी हिंदुत्ववाद, मोदी – शाहांची हुकुमशाही वृत्ती, देशात भाजपकडून होत असलेली दडपशाही अशा धोरणामुळे भविष्यात देश संकटात येण्याची चिन्हे आहेत. भाजपसारख्या भस्मासुराला ठक्कर द्यायची असेल तर काँग्रेसच्या मंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे, अशीही भावना या सूत्रांनी व्यक्त केली.

हा व्हिडीओ सुद्धा पाहा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी