35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजMHADA Examination : पेपर फुटीनंतर म्हाडा परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

MHADA Examination : पेपर फुटीनंतर म्हाडा परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

टीम लय भारी

मुंबई : राज्यात पेपर फुटीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आरोग्य भरती परीक्षांच्या पेपर पाठोपाठ म्हाडा परीक्षेचे पेपर फुटल्याने तीव्र संताप व्य़क्त होतोय. या सर्व गोंधळामुळे म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता म्हाडाकडून परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आहे. या कंपनीमार्फत १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे(MHADA exam, New schedule announced after paper leak).

म्हाडाने विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड केली होती. मात्र कंपनीने परीक्षेच्या गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट आखला, त्यामुळे या कंपनीचे संचालक यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली, या घटनेमुळे १२ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली.

MHADA Paper Leak | घरातली वस्तू कधी मिळणार, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी आरोपींचा होता हा कोडवर्ड

MHADA परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

हे प्रकरण शांत करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री आणि म्हाडा अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही भरती परीक्षा म्हाडा स्वतः घेईल असे जाहीर केले. मात्र म्हाडा प्रशासनाला पावणे तीन लाख उमेदवारांची परीक्षा घेणे शक्य नसल्याने अखेर टीसीएस कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही भरती परीक्षा आता १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक आणि अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करण्यात येतील.

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

TET paper leak case: Cash, gold worth Rs 2 cr recovered after searches at houses of Supe’s kin

यापूर्वी भरती परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती. त्यामुळे उमेदवारांची मागणी लक्षात घेता म्हाडाने १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी