31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजऔरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान, 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार

औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान, 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार

टीम लय भारी

औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगावमधील नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. तर फुलंब्री, सिल्लोड येथील नगरपंचायतींच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच फुलंब्री, सिल्लोड आणि येथील ग्रामपंचायतींसाठीही आज मतदान होत आहे. या निवडणुकांची मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे(Aurangabad, Voting for Soygaon Nagar Panchayat today).

सोयगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मतदान

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतदान होत असून 17 जागांपैकी 4 जागा ओबीसींच्या असल्याने येथे उर्वरीत 13 जागांवर मतदान घेतले जाणार आहे. सोयगाव येथील निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना 13 ,भाजप 13 ,कांग्रेस 6, राष्ट्रवादी 5 (आघाडी),व अपक्ष 3 असे एकूण चाळीस उमेदवार रिंगणात आहेत.

महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

सिल्लोडमध्ये 1 जागेसाठी मतदान

सिल्लोड नगर परिषदेच्या एका जागेसाठी आज मंगळवार दिनांक 21 रोजी मतदान होत असून या प्रभागात 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरताना दहा उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केले होते, त्यापैकी छाननीमध्ये चार अर्ज बाद झाल्यानंतर सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

Polling underway in 102 nagar panchayats in Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी