33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजMigrant Workers : जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या आमदारांना फटकारले, ठाकरेंवरील टीकेचा घेतला समाचार

Migrant Workers : जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या आमदारांना फटकारले, ठाकरेंवरील टीकेचा घेतला समाचार

टीम लय भारी

मुंबई : आजारातून बरे झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सोशल मीडियात पुन्हा जोरदार सक्रीय झाले आहेत. आपला बहुजन बाणा जपत ते विरोधकांचा समाचार घेऊ लागले आहेत.  मजुरांच्या ( Migrant Workers ) मुद्द्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या एका ट्विटचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Rane Vs Pawar

आमदार भातखळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्विट केले आहे. ‘ सोयीचे असेल तेव्हा तमाम हिंदू मातांनो, बंधूंनो म्हणायचे, आणि नसेल तेव्हा परप्रांतीय म्हणून जबाबदारी झटकायची’ अशा शब्दांत भातखळकर यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भातखळकर पुढे असेही म्हणतात की, ‘राज्य सोडून जाणारे परप्रांतीय मजूर ( Migrant Workers ) म्हणताहेत आम्ही परत येणार नाही, राज्य सरकारने आमची काहीच मदत केली नाही. लोकांचे हाल बघवत नाहीत.’

भातखळकर यांच्या या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. ‘तुमचे आदित्यनाथ म्हणतात की, एकाही माणसाला ( Migrant Workers ) उत्तर प्रदेशमध्ये येऊ देणार नाही. वाईट वाटते. गरीबांचे हाल झाले. केंद्र सरकारने जबाबदारी घेतलीच नाही’ अशा शब्दांत आव्हाड यांनी भातखळकर यांना फटकारले आहे.

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राजकारण

मुंबई व महाराष्ट्रात असलेल्या परप्रांतीयांना ( Migrant Workers ) आपापल्या राज्यात पाठविण्याच्या मुद्द्यावरून भाजप व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात ‘महाविकास आघाडी’ सरकारने लाखो परप्रांतीय मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय केली.

अलिकडच्या काही दिवसांत एसटी बसेसच्या माध्यमातून तब्बल अडिच लाख परप्रांतीय मजुरांना आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात आले. या मजुरांना ( Migrant Workers ) घेऊन जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारनेच आग्रह धरला, म्हणून केंदाने ही सेवा सुरू केल्याचे महाविकास आघाडी समर्थकांचे म्हणणे आहे.

केंद्राने मजुरांना ( Migrant Workers ) नेण्यासाठी रेल्वे सेवा सुरू केली. पण त्यांना मोफत प्रवासाची सोय केली नाही. हा खर्च कॉंग्रेसने उचलला. अनेक मजुरांनी रेल्वेमध्ये महाराष्ट्र सरकारचे कौतुक करणाऱ्या घोषणा दिल्या. महाराष्ट्रात चांगली सेवा मिळाली, पण उत्तर प्रदेशमध्ये पाणीही मिळत नाही असे सांगणाऱ्या मजुरांचे व्हिडीओ सुद्धा महाविकास आघाडी समर्थकांकडून व्हायरल केले गेले.

भाजप समर्थकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर उलट आरोप केले जात आहेत. मोदी सरकारने रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे परप्रांतीय मजुरांना ( Migrant Workers ) आपल्या घरी जाणे सोपे झाल्याच्या जाहिरात योगी आदित्यनाथ यांनी मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये दिल्या आहेत.

परप्रांतीयांना पुरेसे जेवण मिळत नव्हते. त्यांची सरकारने काळजी घेतली नाही असे आरोप भाजप समर्थकांकडून केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

FightWithCovid19 : जितेंद्र आव्हाडांचा भावनिक संदेश, मी गोरगरीबांसाठी झटलो… हा गुन्हा केलाय का ?

AwhadVsBJP : ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार,  मुलीवर बलात्कार करू’

Battle Successful, Says Awhad After Recovering from Covid-19

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी