34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमंत्रालयCorona : ठाणे महानगरपालिकेत आणखी एक IAS अधिकारी

Corona : ठाणे महानगरपालिकेत आणखी एक IAS अधिकारी

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ ( Corona ) आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या मदतीसाठी आणखी एका आयएएस अधिकाऱ्याला तात्पुरते पाठविले आहे. रणजीतकुमार असे या आयएएस अधिकाऱ्यांचे नाव आहे.

रणजितकुमार हे माहिती तंत्रज्ञान विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत. आपले नियमित काम सांभाळून ठाणे महापालिकेची ( Corona ) अतिरिक्त जबाबदारी पार पाडण्यास रणजीतुकमार यांना सांगण्यात आले आहे.

Mahavikas Aghadi

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. आयुक्त विजय सिंघल यांना मदत करण्याचे काम रणजीतकुमार करतील.

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना ( Corona ) रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत 1700 रूग्ण सापडले आहेत. आज एकाच दिवसात 134 रूग्ण आढळून आले आहेत. ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य सचिवांनी महापालिकेत आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तीन दिवसांपूर्वीच महापालिकेत संजय हेरवडे व गणेश देशमुख या दोन अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्याला तात्पुरती जबाबदारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Truth : सायन हॉस्पिटलच्या ‘त्या’ व्हिडिओ मागची सत्यता!

Politics : संजय राऊतांनी राज्यपालांना ‘का’ घातला ‘कोपरापासून’ दंडवत?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी